Saturday, January 23, 2021
No menu items!
Home मोबईल धनंजय मुंडे यांच्या विशेष निर्णयामुळे ’त्या’ दोन्हीही विद्यार्थिनींना मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ!

धनंजय मुंडे यांच्या विशेष निर्णयामुळे ’त्या’ दोन्हीही विद्यार्थिनींना मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ!


तेजस्वीला मिळणार पूर्ण लाभ तर स्नेहाचे विद्यापीठ व कोर्स बदलून मिळणार
मुंबई (रिपोर्टर)- परदेश शिष्यवृत्तीसह अन्य सर्वच योजनांमध्ये विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत धडाडीने निर्णय घेण्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे वेगळेपण नेहमीच अधोरेखित झाले आहे. कु. तेजस्वी शिंदे व कु. स्नेहा घोडेस्वार यांच्या परदेश शिष्यवृत्तीमध्ये विशेष बाब म्हणून निर्णय घेत लाभ मिळवून देण्याचा बाबतीतही या दोन्ही विद्यार्थिनींना हाच अनुभव आला आहे.
कु. तेजस्वी लक्ष्मण शिंदे ही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील अंगापूर येथील प्रतिभावंत विद्यार्थिनी ’स्पेस सायन्स’ अर्थात अंतराळ विज्ञान शाखेत ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठात पीएचडी चे शिक्षण घेत असून, जगभरातील निवडक 150 विद्यार्थ्यांपैकी हा बहुमान मिळालेली ती एक विद्यार्थिनी आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे तिला देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम परदेश शिष्यवृत्ती च्या मिळणार्‍या रक्कमेतून वजा करण्याचा मूळ नियम आहे. परंतु कु. तेजस्वी हिची आर्थिक परिस्थिती पाहता तिने परदेश शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम मिळावी, जेणेकरून तिच्या परदेशातील शिक्षण व उदरनिर्वाहास अडचण येणार नाही, अशी विनंती सामाजिक न्याय विभागाकडे केली होती, ही बाब ना. मुंडे यांना समजताच 27 जुलै 2017 च्या शासन निर्णयाप्रमाणे परदेश शिष्यवृत्ती योजनेतील देय असलेला पूर्ण लाभ सदर विद्यार्थिनीस देण्यात यावा असा आदेशच ना. मुंडे यांनी विभागामार्फत निर्गमित केल्याने तेजस्वीच्या आनंदाला पारावार उरला नाही; मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणार्‍या ना. मुंडे यांचे मी मनःपूर्वक आभार मानते, तुमच्यामुळेच माझ्या स्पेस सायन्स पीएचडीची वाट मोकळी होऊ शकली, अशा शब्दात तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर दुसर्‍या एका प्रकरणात नागपूर येथील कु. स्नेहा काशीनाथ घोडेस्वार या विद्यार्थिनीला ऑस्ट्रेलिया मधील सिडनी विद्यापीठात मास्टर ऑफ इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता व ती परदेश शिष्यवृत्तीस पात्र ठरली होती, मात्र सदर विद्यापीठाने ऐनवेळी तिच्या जागी दुसर्‍या विद्यार्थ्यास (पान 7 वर)

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...