अंबाजोगाई (रिपोर्टर) – अंबाजोगाई जवळील अंबासाखर कारखाना ते लातूर रोडवर असलेल्या जोगाईवाडी चौका जवळ मॉर्निगवाक साठी गेलेल्या दत्ता लक्ष्मण ठोंबरे वय 36 वर्ष रा मोरेवाडी या युवकास पाहटे पाच ते साडेपाच वाजल्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने भरधाव वेगात चिरडल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की मोरेवाडी येथे पिठाची गिरणी चालविणारे दत्ता लक्ष्मण ठोंबरे वय 36 वर्ष हे दररोज मॉर्निगवाक साठी लातूर रोड या हायवेवर जात असत नियमितपणे आज देखील ते पाच वाजल्याच्या सुमारास मॉर्निगवाक साठी गेले असता लातूर रोड वरील जोगाईवाडी चौकात अज्ञात वाहनाने चिरडले त्यामध्ये शरीराचे दोन तीन तुकडे झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सदरील वाहन तेथुन तात्काळ फरार झाले असून पुढे असलेल्या सेलू टोल नाक्यावरील सी सी टिव्ही चे करून पोलीस सदरील वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर दत्ता ठोंबरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा आई वडील असा परिवार असून त्यांच्या अपघाती निधनाने मोरेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे