Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home क्राईम धारूर येथील जीनिंगला आग लाखो रुपयांचे नुकसान

धारूर येथील जीनिंगला आग लाखो रुपयांचे नुकसान


केज, अंबाजोगाई, धारूरच्या अग्निशमन दलाला पाचारण
धारूर (रिपोर्टर)- आडस रोडवर असलेल्या बालाजी अ‍ॅग्रो जीनिंगला आज सकाळी अचानक आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने धारूर, केज, अंबाजोगार्स येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून भस्मसात झाला. ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नव्हते.

134668028 3575435929213213 7252012593365436487 n
बीड जिल्ह्यामध्ये कापसाची खरेदी-विक्री सुरू आहे. धारूर तालुक्यातील आडस रोडवर बालाजी अ‍ॅग्रो जीनिंग असून या जीनिंगमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करून कापूस साठवण्यात आला होता. आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान कापसाला आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न तेथील कर्मचार्‍यांनी केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून धारूर नगरपालिका, अंबाजोगाई, केज नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. आग नेमकी कशी लागली हे मात्र समजू शकले नाही. 

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....