बीड (रिपोर्टर) येत्या शनिवारपासून सलग चार दिवस राष्ट्रीयकृत बँकांसह नागरी, सहकारी बँकांना सुट्टी असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडणार आहे.
येत्या शनिवार दुसरा शनिवार आहे. त्यानंतर रविवार, 15 ऑगस्ट आणि सोमवारची एक शासकीय सुट्टी असे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असे सलग चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरीक, व्यापारी यांची तारांबळ उडणार आहे.