बीड (रिपोर्टर)- शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोरील नाली आज सकाळी तुंबल्याने रस्त्यावर तळेच दिसून येत होते. या रस्त्यावर नेहमीच नाल्या तुंबत असल्याने नालीचे पाणी रस्त्यावरून वाहते. नगरपालिका प्रशासन या भागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
बीड शहरातील अनेक गल्ली बोळातील नाल्यांची स्वच्छता वेळे केली जात नसल्याने नाल्या तुंबून त्याचे पाणी रस्त्यावरून वाहते. बीएसएनल कार्यालयासमोरील रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. ना रस्ता दुरुस्त होतो ना नाल्यांची दुरुस्ती केली जाते, पावसाळ्यात तर रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचलेले असते. आज सकाळी या रस्त्याच्या कडेची नाली तुंबल्याने रस्त्यावर पाणीच पाणी जमा झाले होते. या पाण्याचा त्रास आजुबाजुच्या नागरिकांसह दुकानदारांना सहन करावा लागतो. नगरपालिका प्रशासन या रस्त्यावरील नाल्या स्वच्छ करण्याकडे का दुर्लक्ष करते. प्रशासन तर शहर स्वच्छतेचा नेहमीच आव आणत असते. हेच शहर स्वच्छ का? असा सवाल या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.