केज (रिपोर्टर) – शहरातील धारुर रोडवर राहणार्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. सदरील आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
सुमीत चंद्रकांत साठे वय-18 वर्षे,रा.धारुर रोड केज या विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सदरील हा प्रकार घरच्या लोकांच्या निर्दशनास आल्यानंतर याची माहिती पोलीसांना देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णांलयामध्ये आणण्यात आला होता. आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.