Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड सायं. दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान...

सायं. दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्यांची रिघ


दुपारपर्यंत ६० पेक्षा अधिक रक्तदात्यांचे रक्तदान
बीड (रिपोर्टर)- सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी एक वाजेपर्यंत ६० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. सायंकाळपर्यंत शिबीर सुरू राहणार आहे. वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी भ्रमणध्वनीद्वारे व समक्ष भेटून शेख तय्यब यांना शुभेच्छा दिल्या.

sahe


गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण जाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदात्यांना आवाहन केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन विविध पक्ष-संघटना, सामाजिक संस्था करत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त रिपोर्टर भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते. सकाळीच संपादक शेख तय्यब यांनी स्वत: सर्वप्रथम रक्तदान करून शिबीराची सुरुवात केली. त्यानंतर रक्तदात्यांनी रिपोर्टर भवन येथे मोठी गर्दी करत शेख तय्यब यांना शुभेच्छा देत सर्वश्रेष्ठ दान असलेले रक्तदान केले.

8

दुपारी एक वाजेपर्यंत ६० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सायंकाळपर्यंत सदरचे रक्तदान शिबीर सुरू राहणार आहे. शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, विविध पक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तित होते. या वेळी संपादक शेख तय्यब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भ्रमणध्वनीव्दारे संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....