बीड (रिपोर्टर)- सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले रिपोर्टर परिवाराच्या आवाहनास प्रतिसाद देत 130 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान करून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी भ्रमणध्वनीद्वारे व समक्ष भेटून शेख तय्यब यांना शुभेच्छा दिल्या
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण जाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदात्यांना आवाहन केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन विविध पक्ष-संघटना, सामाजिक संस्था करत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त रिपोर्टर भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते. सकाळीच संपादक शेख तय्यब यांनी स्वत: सर्वप्रथम रक्तदान करून शिबीराची सुरुवात केली. त्यानंतर रक्तदात्यांनी रिपोर्टर भवन येथे मोठी गर्दी करत शेख तय्यब यांना शुभेच्छा देत सर्वश्रेष्ठ दान असलेले रक्तदान केले.तब्बल 130 रक्तदात्यानी रक्तदान केले