गेवराई पोलीस ठाण्यांतर्गत चोर्यांचे सत्र थांबेना, नागरिकात भितीचे वातावरण
4 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 25 हजारांची रोकड लंपास
गेवराई (रिपोर्टर) औरंगाबाद येथील आपल्या बहिणीकडे रक्षशबंधनासाठी सहकुटुंब गेलेल्या शिक्षकाचे घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील 4 तोळे सोन्याचे दागिने, लहान मुलाची सायकल आणि रोख 25 हजार रुपये लंपास केल्याची घटना दि. 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान घडली. जेव्हा शिक्षक गढी येथे परत आल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काल गेवराई पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली. गेवराई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चोर्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणेप्रमुख पेलगुरवार यांच्या कार्य प्रणालीवर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
गेवराई तालुक्यातील गढी येथे आनंद दिनकर ढाकणे (वय 42 वर्षे) हे शिक्षक आपल्या कुटुंबियासह राहतात. त्यांची बहिण औरंगाबाद येथे असल्याने ते रक्षा बंधनासाठी 11 ऑगस्ट रोजी गेले होते. 12 ऑगस्ट रोजी ते पुन्हा घरी परतले असता आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले 3 तोळ्याचे गंठण, 4 सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येक 5 ग्रॅम), लहान मुलाची सायकल आणि रोख 25 हजार रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याचे गेवराई पोलिसात दिलेल्या तक्रारीत ढाकणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुतार हे करत आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक पेलगुरवार यांनी घटनास्थळी भेट दिली.