Saturday, January 23, 2021
No menu items!
Home शेती मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याचा आकडा दुपटीने वाढला

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याचा आकडा दुपटीने वाढला


बीड (रिपोर्टर): राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या सुरूच आहे. भाजपा आणि सध्याच्या महाआघाडी सरकारने कर्ज माफीची घोषणा केल्यानंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत. सर्वात जास्त आत्महत्येची नोंद मराठवाड्यामध्ये होवू लागली. गेल्या दहा वर्षांमध्ये मराठवाड्यात दुपटीने आत्महत्या वाढली असल्याचे समोर आले. शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या वाढू लागल्या आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी ना केंद्र सरकार प्रयत्न करत आहे ना राज्य सरकार. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेचा विषय झाला आहे.

२००१-२०१३ या दरम्यान मराठवाड्यामध्ये ११२१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या तर २०१४ ते २०२० या दरम्यान ५ हजार ३७० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. २०१४ ते २०२० या दरम्यान शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पाहिली असता आत्महत्येच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. राज्यामध्ये शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांना याकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो मात्र या कर्जमाफीतून आत्महत्या थांबल्या नसल्याचे आजपर्यंतच्या कर्जमाफीतून दिसून आले. भाजपा सरकार आणि सध्याच्या विद्यमान महाआघाडी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतरही मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पूर्वी सर्वात जास्त आत्महत्येचा आकडा विदर्भात असायचा मात्र आता त्याची जागा मराठवाड्याने घेतली आहे. आत्महत्या रोखण्याच्या वल्गना फक्त कागदावर दिसून येतात.

प्रत्यक्षात मात्र आत्महत्या रोखण्यात शासनाला अपयश येत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. कर्जबाजारीपणा, सावकाराचा फास, नापिकी आणि निसर्गाची मिळत नसलेली साथ या चक्रव्यूहात शेतकरी अडकत असल्याने तो आत्महत्येचा मार्ग पत्कारत असल्याचे दिसून येत आहे.

नुकसान भरपाईतून काही साध्य झाले नाही
गारपिट, अतिरिक्त पाऊस यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेलं नुकसान आणि शासनाने केलेली मदत यामध्ये मोठी तफावत आहे. तोंडाला पाने पुसल्याप्रमाणे शासनाने शेतकर्‍यांना मदत दिल्याने या मदतीतून शेतकर्‍यांचा कसल्याही प्रकारचा हित जोपासले नसल्याचे दिसून आले.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...