Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home आरोग्य & फिटनेस चार तालुके निल, सात तालुक्यात ४४ बाधीत जिल्ह्यात २४ कोरोना मुक्त

चार तालुके निल, सात तालुक्यात ४४ बाधीत जिल्ह्यात २४ कोरोना मुक्त


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील ४ तालुक्यांमध्ये आज एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नसून सात तालुक्यात तब्बल ४४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. आज आष्टी तालुक्याचा आकडा सर्वाधिक १६ वर जावून पोहचला आहे. दुसरीकडे कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज २४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बीड जिल्ह्यातून तब्बल ५३८ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता यामध्ये ४९४ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला तर ४४ जण कोरोना बाधीत आढळून आले. जिल्ह्यातील अंबाजोगाई ३, आष्टी १६, बीड ८, गेवराई २, माजलगाव ५, परळी ८, पाटोदा तालुक्यात २ रुग्ण आढळून आले असून अन्य चार तालुक्यात आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. दुसरीकडे कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज २४ कोरोना बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांची संख्या १६ हजार ८४४ वर जावून पोहचली आहे. तर कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या १६ हजार ५५ एवढी असून आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ५३३ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८१ हजार १३० संशयितांच्या चाचण्या झाल्या असून त्यात १ लाख ६४ हजार २८६ संशयित निगेयिव्ह आले आहेत.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...