Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home क्राईम तरुणीने बोलण्यास नकार देताच तलवारीने हल्ला हल्लेखोर जेरबंद

तरुणीने बोलण्यास नकार देताच तलवारीने हल्ला हल्लेखोर जेरबंद


बीड (रिपोर्टर)- तु मला धोका दिलास म्हणत सतराव वर्षाच्या अल्पवयीन तरुणीवर तलवारीने हल्ला करणार्‍या पोपट बोबडे याच्या अखेर बीड ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून ३१ डिसेंबर रोजी बीड शहरातील महालक्ष्मी चौक सदरचा हल्ला झाला होता. यातील जखमी तरुणीवर बीड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सदरचा प्रकार केवळ तरुणीने बोलण्यास नकार दिला म्हणून झाल्याचे सांगण्यात येते.


बीड शहरातील लक्ष्मी चौक भागात राहणार्‍या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीची ओळख याच भागातील पोपट बोबडे याच्या सोबत झाली. काही दिवस ते भ्रमणध्वनीवर बोलत असायचे. एके दिवशी पोपट बोबडे हा तिच्या घरी आला तेव्हा सदरच्या तरुणीने यापुढे तू घरी येत जाऊ नकोस आणि बोलूही नको असे म्हटले परंतु तरीही बोबडे तरुणीच्या घरासमोर येत जात असायचा. सदरच्या तरुणीस जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा त्यामुळे ती तरुणी काही दिवस आपल्या एमआयडीसी भागातील घरात राहण्यासाठी गेली होती. आईच्या हाताला दुखापत झाल्यामुळे ती पुन्हा महालक्ष्मी चौकातील घरात राहण्यासाठी आली असता ३१ डिसेंबर रोजी पोपट बोबडे याने तिच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या एका हाताला आणि पायाला मोठी जखम होऊन तिला फ्रॅक्चर झाले. एवढेच नव्हे तर तिच्या केसाला धरून ओढतही नेले. भयभीत झालेली तरुणी आजी-आजोबाकडे पळत गेली तेव्हा पुढील अनर्थ टळला. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात आरोपी-विरुद्ध कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला. रात्री पोलिसांनी बहिरवाडी शिवारातून त्याला जेरबंद केले. सदरची कारवाई ठाणेप्रमुख पीआय संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगेश उबाळे, पो.शिपाई बाळकृष्ण म्हेत्रे, पो.नाईक रविंद्र जाधव यांनी केली.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....