Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड दिल्लीच्या किसान मोर्चासाठी शंभर वाहनांचा ताफा रवाना बीडमधून किसान सभेचे कार्यकर्ते रॅलीत...

दिल्लीच्या किसान मोर्चासाठी शंभर वाहनांचा ताफा रवाना बीडमधून किसान सभेचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी


बीड (रिपोर्टर)- केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक आणले असून हे जाचक विधेयक रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातून अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना होत आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील १० कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपुर्वी कृषीचे तीन विधेयक आणले. या विधेयकांना हरियाणा, पंजाबसह इतर राज्यांच्या शेतकर्‍यांकडून विरोध होत आहेत. कृषी विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या पस्तीस दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची अद्यापही केंद्र सरकारने दखल घेतली नाही. आंदोलनकर्त्यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातील किसान मोर्चाच्या शंभर वाहनांचा ताफा दिल्लीकडे रवाना झाला. यामध्ये किसान सभेच्या वतीने कॉ. नामदेव गावडे, कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. राम बाहेती, राजन क्षीरसागर, ज्योतीराम हुरकुडे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...