Friday, January 22, 2021
No menu items!
Home महाराष्ट्र क्रांतीज्योतींच्या जयंतीदिनी राज्यात ‘महिला शिक्षक दिन’

क्रांतीज्योतींच्या जयंतीदिनी राज्यात ‘महिला शिक्षक दिन’

अनुयायांच्या इच्छेनुसार फुलेवाड्याचा विकास करू -ना.धनंजय मुंडे
पुणे/बीड (रिपोर्टर)- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आज सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनापासून राज्यात महिला शिक्षक दिन साजरा करण्यास सुरुवात केल्याचे सांगत आजपर्यंत फुले वाड्याचा विकास झाला आहे, परंतु अनुयायांची इच्छा आहे, आणखी विकास व्हायला हवा, त्या पद्धतीने फुलेवाड्याचा विकास महाविकास आघाडी करणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले.

135492279 667244147279846 2794083064282132730 n


ते पुणे येथील फुलेवाडा येथे माध्यमांसोबत बोलत होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फुलेवाडा या ठिकाणी जाऊन महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. या वेळी ना. मुंडेंनी फुलेवाडा पाहितला. तेथील विहिरीची पाहणी केली. उपस्थित माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी १८४८ मध्ये याच वाड्यातून महिला शिक्षणाचे बिजारोपण केले. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अनेक अडीअडचणींना तोंड देत मुलगी शिकली तरच भविष्य आहे हे त्यांनी त्यावेळी सांगत मुलींना शिकण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा केली. सावित्रीबाई एक ज्ञानगंगा आहेत, त्यांच्या जन्मदिनी महिला शिक्षक दिन साजरा करण्याचा निर्णय राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्याची सुरुवात नायगाव येथून होत असल्याचे ना.मुंडेंनी या वेळी सांगितले. जेव्हा मंत्री मंडळाची बैठक झाली, या बैठकीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या पालकमंत्र्यांनी जातीने उपस्थित राहत हा महिला शिक्षक दिन साजरा करावयाचा आहे. तो आजपासून साजरा होत आहे. मी आज या ठिकाणी फुले दाम्पत्यासमोर नतमस्तक होत माझ्या जिल्ह्यासाठी निघालो आहे. फुलेवाड्याचा विकास भुजबळ साहेबांनी याआधी तत्कालीन सरकारमध्ये असताना केला आहे. आणखी या वाड्याचा विकास व्हावा, अशी अनुयायांची इच्छा आहे. अनुयायांच्या इच्छेनुसार राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फुलेवाड्याचा विकास करेल, असे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिले.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...