Saturday, January 23, 2021
No menu items!
Home बीड अग्रलेख- माय तू सावित्रीची लेक आहेस

अग्रलेख- माय तू सावित्रीची लेक आहेस


गणेश सावंत
९४२२७४२८१०
परावचक्राच्या जखडातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड हिंदुस्तानातील सर्वसामान्य माणसांना मुक्ती मिळावी, स्वातंत्र्याचा श्‍वास घेता यावा, होय मी या घराचा मालक आहे, या देशाचा मालक आहे हे हक्काने म्हणता यावं यासाठी सोळाव्या शतकात सर्वप्रथम क्षत्रियांचे मनगटे शिवशिवत असताना ते मुजरे घालण्यात मग्न होते तेव्हा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेबांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले अन् पुणे परगण्यात बाल शिवबाच्या हाती सोन्याचा नांगर देत पडीक जमीन कसायला सुरुवात केली, तसे माणसांचे मस्तके कसून स्वातंत्र्य हा हक्क असल्याचे दाखवून दिले आणि पुढे स्वराज्य निर्माण झाले. मात्र परावचक्राचे आक्रमण पुढेही चालूच राहिले आणि या देशावर इंग्रजांनी आपला विळखा अझगराप्रमाणे मारला. तेव्हा अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतीकारी, स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. परंतु जोपर्यंत घरातली बाई शिकणार नाही, तिला हक्क कळणार नाही, स्वातंत्र्य कळणार नाही, अधिकार कळणार नाहीत तोपर्यंत तिच्या उदरातून तेजोमय असे पुत्र जन्माला येणार नाहीत. त्यासाठी अगोदर महिला शिकल्या पाहिजेत. म्हणून अठराव्या शतकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिकवण्याचे धाडस केले. त्या वेळी

धर्म बुडाला

ची आवई बेंबीच्या देठापासून सनातन उच्चवर्णीयांनी उठवली. पुण्याच्या भिडे वाड्यात केवळ सहा मुलींना सोबत घेऊन शाळा सुरू केल्यानंतर बघता-बघता या शाळेत ४०-४५ मुली शिक्षणासाठी येऊ लागल्या तेव्हा ‘धर्म बुडाला, जग बुडणार, कली आला,’ असे सांगून सनातन्यांनी, धर्म मार्तंडांनी शाळेला विरोध करत सावित्री ज्योतीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकले, चिखल फेकला, दगड मारले, मात्र या स्थितीतही आता जिजाऊ मॉ साहेबांसारखी तलवार हातात घेऊन नव्हे तर पेन-पेन्सील हातात घेऊन लढण्याचे धारिश्ट्य सावित्रीबाईंनी दाखविले. त्या धर्ममार्तंडांच्या या विरोधापुढे झुकल्या नाहीत, शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी आपली उभी हयात घातली. स्त्रियांमध्ये आत्मविश्‍वास वाढवणे गरजेचं आहे. त्यासाठी नेमके काय करायचे? हा विचार जेव्हा त्यांच्या मनात घोंगावला तेव्हा ज्या काही क्रूर रुढी-परंपरा आहेत त्याला आळा घातला पाहिजे मग त्या बालवयातील लग्न असो, केशवपण असो, अथवा अन्य करनी कवटाळ आणि नवसे-सायसे यालाही प्रखर विरोध चालू ठेवला आणि त्या रुढी बंद कशा होतील याकडे सावित्रीबाईंनी खास करून लक्ष घातलं. मुलींची पहिली शाळा सुरू करणार्‍या सावित्रीबाई फुलेंबाबत डॉ. श्रीमंत कोकाटे म्हणतात,

ज्ञानाई


विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने शाळा महाविद्यालय सुरू केल्याचा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती, त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता.सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल आदर आहे, परंतु सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया आपल्या देशात प्रथमतः फुले दांपत्याने घातला.सावित्रीबाई फुले यांच्या काळात जर सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाईंनी सरस्वतीलासुद्धा शिकविले असते, इतक्या मोठ्या मनाच्या सावित्रीबाई होत्या.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकविले त्या देशातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींना मोफत शिकविले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. बालविवाहाला प्रतिबंध केला. केशवपन पद्धतीला तिलांजली दिली.बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून निराधार महिलांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना मदत केली. गुंडांना पायबंद घातला. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्त्री असल्याचा त्यांनी कधीही न्यूनगंड बाळगला नाही.त्यांनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले.पती निधनानंतर सती न जाता निर्भीडपणे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेले.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण त्या संकटात डगमगल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. सावित्रीबाई फुले लढणार्‍या होत्या, रडणार्‍या नव्हत्या. सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य आपल्याला हे सांगते की मुलगीसुद्धा वंशाला दिवा असते.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा हा फोटो मूळ फोटो आहे. हा फोटो जाणीवपूर्वक काढलेला नसून सहज काढलेला आहे. यामध्ये सावित्रीबाई उजव्या बाजूला आहेत.म्हणजे स्त्री ही दुय्यम दर्जाची नसून ती देखील हिम्मतवान, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असते, हे फुलेंच्या नेणिवेतदेखील होते.
सावित्रीबाई यांनी ते दाखवून दिले, त्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत, त्या केवळ पारंपारिक शिक्षिका नव्हत्या, तर त्या लेखिका, कवयित्री आणि प्रबोधनकार होत्या. श्रीमंत कोकाटेंची ही प्रतिक्रिया नक्कीच आज्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. परंतु आज मितीला आम्हाला त


माय तु सावित्रीची
लेक आहेस

याची आठवण आजच्या स्त्री जगताला करून द्यावेशी वाटत आहे. आजची परिस्थिती १६ व्या अथवा १८ व्या शतकाएवढी भयावह नसली तरीही तेवढीच गंभीर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आजही महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला ही भोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहितलं जात आहे, आजही स्त्री अत्याचाराचे अनेक प्रकरणे पहावयास मिळत आहेत. परंतु या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आजच्या सावित्रीच्या लेकी तेवढ्या ताठर आहेत का? सावित्रीबाई फुलेंनी जी शिक्षणाची गंगा आणली आणि त्या शिक्षणाच्या वाहत्या गंगेतून आज खरच मुलींना उच्च शिक्षण मिळते का? ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुलींना आजही उच्च शिक्षण मिळत नसल्याचे सांगण्यात येते. सरकारी आकडेवारी ते दाखवून देते. मग महिला शिक्षणासाठी पुढे येत नाहीत की, घरातील आई-वडिल मुलींच्या शिक्षणाबाबत गांभीर्याने घेत नाहीत, मुलीच्या शिक्षणाला आडवे येणारे कारणे कोणते, याचा शोध घेतला तर तो केवळ मुलगी लग्नाला आली आहे, तिचे हात पिवळे करायचे म्हणजेच आजच्या सामाजिक दृष्टीत मुलगी ज्याप्रमाणे दिसते, त्यावरून मुलगी ही आई-बापाच्या डोक्यावर ओझे असते, हा विचार नक्कीच अविवेकी परंतु स्वतंत्र भारतामध्ये महिलांसाठी जे अधिकार दिले आहेत ते स्वागतार्ह आहे आणि त्या अधिकारांचा सद्सद्विवेक बुद्धीने वापर केला तर घराघरात सावित्री जन्मलेल्या दिसतील परंतु याच अधिकाराचा आणि स्वातंत्र्याचा आजकाल गैरवापर होताना दिसतो. म्हणून
पिडीत स्त्रीवर
बहिष्कार

टाकण्याचे धाडस अख्खे गाव करते तेव्हा खरचं तुम्ही-आम्ही त्याच सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात आहोत का? हा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपुर्वी एका गावाने ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन महिलेवर बहिष्कार टाकला. गावकर्‍यांचा आरोपही गंभीर होता. महिला लोकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवते, दाबदडप करते यासह अन्य आरोप करून हा बहिष्कार टाकण्यात आला तर दुसर्‍या एका प्रकरणात कधीही संपर्कात न आलेल्या व्यक्तीवर बलात्कारासारखा गुन्हा दाखल झाला. यातून सावित्रीबाई फुलेंच्या त्या अपार प्रयत्नांना आणि त्या प्रयत्नांना आलेल्या यशाला नख लावण्याचा प्रयत्न नव्हे का, म्हणूनच मायांनो, तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात, तुम्हाला ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातील जिजाऊ व्हायचं, सावित्री व्हायचय.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...