पाटोदा (रिपोर्टर)- राहूल आवारे यांच्या मालकीच्या मॉलमध्ये रात्री चोरीची घटना घडली असून यामध्ये चोरट्याने दुकानातील एक ते दीड लाख रुपयांचा किराणा चोरून नेला. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल आवारे यांच्या मालकीचे पाटोदा-नगर रोडवर आर.के. मार्ट नावाचे मॉल आहे. रात्री अज्ञात चोरट्यांनी या मॉलचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील एक ते दीड लाख रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेर्याचे साहित्यही चोरून नेल्याचे समोर आले. या प्रकरणी पाटोदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.