बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेने पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधले मात्र नगर रोड परिसरात महिलांसाठी एकही स्वच्छतागृह बांधण्यात आले नाही. नगरपालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृह बांधले नाही या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
बीड नगरपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यात आले. हे स्वच्छतागृह पुरुषांसाठी बांधण्यत आले, महिलांसाठी एकही स्वच्छतागृह बांधण्यात आले नाही. स्वच्छतागृहां-अभावी महिलांची कुचंबना होत असून न.प.ने महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधावीत या मागणीसाठी न.प. प्रशासनाच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी गणेश ढवळेंसह शेख यूनुस यांची उपस्थिती आहे.