Friday, January 22, 2021
No menu items!
Home क्राईम घरातून ओढून नेत नराधमाचा आदिवासी महिलेवर बलात्कार

घरातून ओढून नेत नराधमाचा आदिवासी महिलेवर बलात्कार


केज (रिपोर्टर)- एका आदीवासी समाजातील 22 वर्षीय विवाहित महिलेचा नवरा घरी नसताना तिचे तोंड दाबून हाताला धरून ओढीत नेऊन शेतात बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून नराधम आरोपी विरुद्ध बलात्कारासह ट्रॉसिटीचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील डोणगाव येथील शेतात आदिवासी कुटुंब राहत आहे. दि 28 डिसेंबर रोजी रात्री 9:00 ते 9:30 वा. दरम्यान बाळू वैजनाथ घुले याने पीडित महिलेचा पती घरी नसल्याची संधी साधून तिच्या घराची कडी वाजविली. पिडितेने तिचा पती आला आहे असे समजून दार उघडले. दार उघडताच त्या नराधमाने तिचा नवरा कुठे गेला? असे विचारले. तिने तिचा नवरा शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला आहे. असे सांगितले; त्या नंतर त्याने त्याला ती आवडते. असे म्हणून शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार देताच; त्या नराधमाने तिचे तोंड दाबून तिच्या हाताला धरून जवळच असलेल्या अभिमान चौरे याच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्या तिच्या नवर्‍यासह तिला व मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...