Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड ग्राउंड रिपोर्टींग- राष्ट्रीय पातळीवर कोडीन कंट्रोल करण्याची गरज

ग्राउंड रिपोर्टींग- राष्ट्रीय पातळीवर कोडीन कंट्रोल करण्याची गरज


परराज्यातून कोडीनयुक्त औषध सप्लाय,गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे इतर राज्यातून महाराष्ट्रात कोडीनयुक्त औषध सप्लाय करण्याचा धंदा
कोरोना लॉकडाऊनमुळे त्या नऊ राज्यातील कोडीनयुक्त औषध संदर्भात चौकशी थांबलेली; आता पुन्हा ड्रग्ज इंस्पेक्टर डोईफोडे करणार त्या कंपन्याशी पुन्हा पत्र व्यवहार
पुन्हा शहरातील रस्त्यावर आढळून आलेल्या रिकाम्या कोडीनयुक्त औषधाच्या बाटल्याचे व झोपेच्या गोळ्याच्या रिकाम्या पाऊचचे ड्रग्ज इंस्पेक्टर यांनी केले दीड तास सर्व्हेक्षण
हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये उत्पादन झालेले, संबंधीत उत्पादकांकडून बॅच नंबरच्या सहाय्याने घेणार पुढील माहिती, इतर राज्यात कोडीनयुक्त औषधा संदर्भात कंट्रोल नसल्याने कोडीनयुक्त औषधाची विक्री
राष्ट्रीय पातळीवर कोडीनयुक्त औषध व झोपेच्या गोळ्या संदर्भात दखल घेण्याची गरज,यापुर्वी बीड शहरात आढळून आलेल्या कोडीनयुक्त औषधांच्या रिकाम्या बाटल्याची चौकशी भारतातील नऊ राज्यात
रिपोर्टरने कचर्‍यातून कोेडीनयुक्त औषधाच्या बाटल्या शोधून त्या बाटल्यावरील बॅच नंबरवरून लावला होता शोध; त्या बाटल्यापण परराज्यातूनच
आलेल्या,बीड अन्न औषध प्रशासन यांनी भारतातील नऊ राज्याला पत्र पाठवून बाटल्या महाराष्ट्रात कशा आल्याची मागितली माहिती

परराज्यातून येणार्‍या ट्रक किंवा इतर वाहनातून या औषधांची तस्करी होत असल्याची चर्चा, पोलीस प्रशासनाने वाहन तपासणी सक्तीची करून गुटखा शोध मोहिम सारखे कोडीनयुक्त औषध शोध मोहित अभियान राबविण्याची गरज
नगर पालिकेने छाटलेल्या कचर्‍यातून शोधून काढल्या कोडीनयुक्त औषधाच्या बाटल्या, हमखास गटारीत फेकून देतात वापरलेल्या बाटल्या, विशेष म्हणजे अनेक बाटल्यावरील बॅच नंबर खोडलेले
हा नशा सोडण्याचा जे तरूण मुले प्रयत्न करत आहेत त्यांची बिकट अवस्था, नशा सोडण्यासाठी करावा लागतो भयानक वेदनाचा सामना
एका बाटलीत थोटे पेट्रोल टाकून बाटलीचे तोंड तोंडाला लावून बाटलीला पंपींग करतात, त्यातून होतो नशा तर सुलोचन, फेव्हिकॉल दस्तीवर टाकून वास घेवून किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये असे पदार्थ टाकून पुर्ण तोंड कॅरीबॅगमध्ये घालून करतात नशा
हा नशा चालता-फिरता करता येतो; विशेषत: नशा केल्यानंतर तोंडातून वास येत नाही, हावभाव बदलत नाही म्हणून पालकांना वर्षानुवर्षे मुलगा एवढा भयानक नशा करतो याची माहिती नाही; अनेक पालक अनभिज्ञ
व्यसन करणारे कशातून व्यसन करतील सांगता येत नाही. अनेक वेळा लहान मुले रस्त्याने जातांना काही तरी रूमालात घेवून त्याचा वास घेतांना किंवा एखादा मुलगा कॅरीबॅगमध्ये तोंड घालून चालतांना दिसून आल्यानंतर सहजासहजी त्या मुलाकडे कोणाचे लक्ष जात नाही. त्या मुलाचे वय पाहिल्यानंतर तो मुलगा हात रूमालचा वास घेवून किंवा कॅरीबॅगमध्ये तोंड घालून नशा करत असेल तर हे सत्य वाटणार नाही. परंतू हे खरे आहे अनेक लहान मुले अशा नशेचे बळी पडत असून जर याकडे दुर्लक्ष केले तर येणारी पिढी बरबादीच्या मार्गावर जाणार यात काही शंका नाही. नशा करण्याचे अनेक प्रकार आहेत. नेमकी ही मुले कोणता नशा करतात याची पाहणी केली तर दस्तीवर सुलोचन व फेव्हिकॉलसारखे कॉस्मेटीक वस्तू टाकून त्याचा वास घेतात. यातून त्यांना नशा होतो. यात सुलोचन व फेव्हिकॉल बनवणार्‍या कंपन्याचा काय दोष? विशेष म्हणजे कॉस्मेटीक पदार्थावर पाहिजे तसा अंकुश नसल्याने किंवा हे पदार्थ आरोग्य प्रशासनाच्या व औषध प्रशासनाच्या इख्त्यारीत नसल्याने याच्यावर अंकुश लावणे ही शक्य नाही. तसेच पेट्रोल याचाही वास घेवून काही तरूण मुले नशा करतांना दिसून येतात. एखाद्या बाटलीत एक घोटभर पेट्रोल असेल तर त्या बाटलीला स्वत:च्या तोंडात घेवून पंपींग करून त्याच्यातून जो वास निघतो त्यातून नशा होतो. अशा प्रकारे कमी पैशात नशा करणार्‍याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. हा नशा चालता फिरता करता येता, नशा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा वास तोंडातून येत नाही किंवा व्यसन करणार्‍या व्यक्तीचे हावभावही बदलत नाही. म्हणुन कुटुंबातील व्यक्तीला आपला व्यक्ती नशा करतो याची माहिती ही होत नाही. अनेक पालक या नशा संदर्भात अनभिज्ञ आहे. नशा करणार्‍या व्यक्तीचा परिवार दहशतीखाली आपले जीवन जगत आहे. नशा करणारा व्यक्ती नशा केल्यानंतर त्याचा रौद्ररूप फक्त त्याचे कुटुंबियच पाहतात. दररोज त्यांना हा त्रास सहन करायचा आहे. एवढेच नव्हे तर हा नशा सोडतांनाही भयंकर वेदनाचा सामना संबंधित व्यक्तीला करावा लागतो. म्हणूनच तरूणांनो जागे व्हा अशा नशाने भयानक आजाराने घेरले जात आहे आयुष्य. परंतू सध्या तरूण असल्याने या नशाची जाणीव होत नाही. नंतर मात्र सगळे आयुष्य काळोखात जगण्याची वेळ येणार यात काही शंका नाही. दुसरी विशेष बाब म्हणजे खोकल्याचे औषध हे औषध सर्वसामान्य आहे. कोणालाही या औषधाची कधीही गरज पडू शकते. परंतू नशा करणार्‍यांनी जावाई शोध लावला आणि चक्क खोकल्याच्या औषधातून नशा करू लागले. हा नशा एवढा भयंकर आहे की, या नशेतून सुटकाच नाही. या औषधात कोडीन नावाचे कंटेट असून या कोडीनमधून नशा होतो. म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने कोडीनयुक्त औषध संदर्भात सक्ती करून औषध विक्रीवर कंट्रोल ठेवले आणि याचा फायदा मोठा झाला. बर्‍या प्रमाणात कोडीनयुक्त औषध राज्यातील औषध दुकानातून फक्त गरजुंनाच देण्याची सुरूवात झाली. परंतू इतर राज्यातून महाराष्ट्रात कोडिनयुक्त औषध सप्लाय होत असल्याचे समोर आले असून इतर राज्यात कोडीन संदर्भात गांभीर्याने दखल घेतली नसल्याने त्या राज्यात कोडीनयुक्त औषधाची सुसाट विक्री होत आहे. त्या राज्यात कोडीन संदर्भात नियम सक्तीचे नसल्याने तेथे कोडीनयुक्त औषध खुलेआम विक्री होते आणि याचा फायदा घेत महाराष्ट्रापर्यंत हे औषध पोहचते. या औषधापासून होणारे घातक परिणाम लक्षात घेता इतर राज्यातही कोडीनयुक्त औषध संदर्भात कंट्रोल करण्याची सक्तीची गरज असून आता राष्ट्रीय पातळीवर कोडीनयुक्त औषधाची दखल घेण्याची गरज आहे.

बीड शहरातील रस्त्यावर, गटारीत खोकल्याच्या कोडीनयुक्त औषधाच्या बाटल्या आढळून आल्यानंतर दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने ही बाब औषध प्रशासन यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या अनुषंगाने औषध प्रशासनाने त्या रिकाम्या बाटल्यावरील बॅच नंबरवरून या बाटल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कशा आल्या? या संदर्भात पाठपुरावा केला. दरम्यान या संदर्भात भारतातील नऊ राज्यात चौकशी सुरू झाली. परंतू कोरोना लॉकडाऊनमुळे हे प्रकरण थांबले होते. अशातच पुन्हा बीड शहरात ऑगस्ट 2020 मध्ये उत्पादन झालेल्या कोडीनयुक्त औषधाच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. या बाटल्या नगर पालिकेने छाटुन ठेवलेल्या कचर्‍यातून व रस्त्यात सापडून आल्याने होत्या. याची दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने पुन्हा औषध विभागाला कळविल्यानंतर औषध प्रशासनानेचे ड्रग्ज इंस्पेक्टर डोईफोडे यांनी रविवारी दीड तास या रिकाम्या बाटल्यावरील बॅच नंबरची तपासणी केली. विशेष म्हणजे झोपेच्या गोळ्याचेही रिकामे पाऊच आढळून आले होते. या संदर्भात डोईफोडे यांनी बारकाईने सर्व्हेक्षण करून संबंधितांना या विषयी पत्रव्यवहार करून विचारणा करणार असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षापासून दै.रिपोर्टर ड्रग्ज व्यसनमुक्ती संदर्भात पाठपुरावा करत आहे. परंतू हा विषय महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचा असल्याने राज्य औषध प्रशासन फक्त पत्रव्यवहार करून पाठपुरावाच करू शकतो. यासाठी राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्याची गरज आहे. जोपर्यंत राष्ट्रीय पातळीवर कोडीनयुक्त औषध कंट्रोल होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे अवैध मार्गाने अशा औषधांची सप्लाय होणार आणि व्यसन करणार्‍यांना महागात का होईना नशेसाठी औषध मिळते हेच महत्त्वाचे आहे. या नशेपासून होणारे हाल बघितले जात नाही. अशा व्यसन करणार्‍यांचा परिवार नेहमी दहशतीत असतो. नेमका हा नशा सोडायचा कसा? असा प्रश्‍न परिवारासमोर असतो. नशा करणार्‍या व्यक्तीला नशा करतांना होणारा त्रास व सोडतांना होणारा यापेक्षा ही भयंकर त्रास सहन करावा लागतो.

प्रशासन तरी काय करणार?
रुग्णांना खोकल्यासाठी वापरात येणारे औषध, झोपेसाठी लागणारे गोळ्या, वाहनांसाठी लागणारे पेट्रोल, पंक्चर चिटकविण्यासाठी लागणारे सुलोचन, फर्निचर कामात वापरण्यात येणारे फेव्हीकॉल अशा वस्तूपासून जर नशा होत असेल व तरुण मुले अशा प्रकारचा नशा करत असतील तर हि गंभीर बाब आहे. प्रशासन आपल्या स्तरावर बरेच काही प्रयत्न करत असले तरी नशा करणारे व त्यांचे पालक यांनी आपली जबाबदारी समजून या नशेपासून मुक्ती घ्यावी. जेणे करुन त्यांच्या कुटूबींयावर भयानक वेळ येणार नाही. वरील दिलेल्या पदार्थापासून नशा होत असेल तर यात संबंधीत कंपनीची काय चुक परंतू औषध प्रशासन फक्त औषधावर वचक बसवू शकते. परंतू इतर कॉस्मेटीक पदार्थावर कशी लगाम लावणार हा प्रश्‍न महत्वाचा असून प्रशासन तरी काय करणार असा प्रश्‍न उपस्थित होतो.
परराज्यातून येणारी
वाहने तपासणे गरजेचे
ज्याअर्थी बीड शहरात गेल्या दोन वर्षापासून शहराच्या विविध भागात कोडीनयुक्त औषधाच्या रिकाम्या बाटल्या आढळून येत आहे. त्या बाटल्या आजही शहराच्या विविध ठिकाणी गटारीत पडून असतात. नेमके या बाटल्या इतर राज्यातून बीडपर्यंत कसे येतात याची सहनिशा केली तर कोडींनयुक्त औषधाची अवैध विक्री थांबेल. ही कोडीनयुक्त
अशा वेदना सहन करण्याची वेळ
असा नशा करणारे तरूण मुले हमखास चालता-फिरता हा नशा करतात. याची परिवाराला भनक लागत नाही. म्हणून मुलांकडे पालकाचे लक्ष नसते. सुरूवातीला हा नशा बरा वाटतो. दमादमाने या नशेच्या विळख्यात तरूणाई घेरली जाते. नशा केल्यानंतर तो व्यक्ती आपल्या हातावर ब्लेडने वार करून घेतो. जर त्याला राग आला तर समोरच्या व्यक्तीला जबर मारहाण करतो. त्या व्यक्तीला कितीही मारले तरी जोपर्यंत डोक्यात नशा आहे तोपर्यंत त्याला मारहाण झाल्याचीही जाणीव होत नाही. नशा उतरल्यानंतर हाता-पायात कंपन होते. तात्काळ त्याला नशा करावा लागतो. नशा केला की तो पुन्हा तंदुरस्त दिसतो. अशा एखाद्या तरूणाने नशा सोडायचा विचार केला तर त्याची भयानक आवस्था होते. रात्रभर झोप येत नाही, डोळ्याची पापणी बंद होत नाही, उभ्याने शौच करण्याची वेळ त्याच्यावर येते अशा भयानक वेदना सहन करून हा नशा सोडता येतो तर मग तरूणांनो जागे व्हा. औषधे परराज्यातून येणार्‍या वाहनातून येत असल्याची चर्चा आहे. परराज्यातून येणार्‍या वाहनांची हमखास ट्रक याची पोलीसांनी कसुन तपासणी केली तर किंवा गुटखा शोध मोहीम सारखे सक्त अभियान राबविले तर कोडिनयुक्त औषधे बीड शहरात येणार नाही. परंतू याकडे कोणीही गांर्भीयाने लक्ष देतांना दिसत नाही.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...