Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड बीड शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार

बीड शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार


बीड (रिपोर्टर)- मुख्य जलवाहिनीवरून उपलाईनला क्रॉस कनेक्शन करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बीडच्या अधिपत्याखाली सुरू असून त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार असून नगरपालिकेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन न.प.चे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी केले आहे.


प्रसिद्धी पत्रकात न.प.ने म्हटले आहे की, बीड शहरातील मुख्य जलकुंभ धानोरा रोड बीड क्षमता 19 लक्ष लिटरच्या बाजुला नवीन जलकुंभ (7.2 लक्ष) चे काम अमृत योजनेतून पुर्ण झाले असून त्या भागातून नळ कनेक्शन ऐंशी टक्के पुर्ण झाल्यामुळे मुख्य जलवाहिनीवरून उपलाईनला क्रॉस कनेक्शन करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिपत्याखाली अमृत योजनेतून युद्धपातळीवर 6 जानेवारी 2021 ते 8 जानेवारी 2021 पर्यंत करण्याचे नियोजीत आहे त्यामुळे सदरील जलकुंभावर होणारा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार आहे आणि संपुर्ण बीड शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ईदगाह रोड बीडच्या डॉ. जाधव दवाखाण्यासमोरील लिकेज् व माजलगाव बॅक वॉटर मुख्य जलवाहिनीवरील लेंडी नाला वॉश आऊट वॉल जवळ लिकेज् दुरुस्तीचे काम साबेर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सदरील लिकेज् दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर एकदिवसा करण्यात येणार आहे त्यामुळे शहरवासियांनी न.प.ला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...