Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड जात पडताळणी समितीचे तिन्ही अधिकारी दोन वर्षांपासून प्रभारी ,अध्यक्ष दोन-दोन महिने फिरकत...

जात पडताळणी समितीचे तिन्ही अधिकारी दोन वर्षांपासून प्रभारी ,अध्यक्ष दोन-दोन महिने फिरकत नाहीत


बीड (रिपोर्टर)- जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष, सदस्य, सचिव हे तिन्ही महत्वाचे अधिकारी सलग एक नाही दोन महिने नाही तर तब्बल दोन वर्षांपासून प्रभारी आहेत. महत्वाचे म्हणजे या समितीचे अध्यक्ष प्रभारी असले तरी ते दोन-दोन महिने बीड येथे येत नाहीत. वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी आणि इतर तत्सम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिल्याशिवाय प्रवेश निश्‍चित होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना धावपळ करत ही फाईल बीड येथून औरंगाबाद आणि अध्यक्ष ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी पाठवावी लागते.


अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या जात पडताळणी समितीचा अध्यक्ष असतो. तर उपायुक्त याचे सदस्य असून सहायक आयुक्त दर्जाचा अधिकारी या समितीचा सदस्य, सचिव असतो. अप्पर जिल्हाधिकारी या पदावर काम करणारे अधिकारी जात पडताळणी समितीला काम करण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे शक्यतो प्रभारी अध्यक्षच या समितीवर नेमला जातो मात्र प्रभारी असले तरी किमान 8 नाही तर 15 दिवसाला येऊन या समितीच्या अध्यक्षांनी येऊन विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीच्या सुनावण्या घेऊन प्रकरणे निकाली काढले पाहिजेत. मात्र बीड येथील खरात नावाचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे बीड, नगर आणि विदर्भातील एक जिल्हा अशा तीन जिल्ह्यांचा प्रभारी अध्यक्षाचा पदभार आहे. हे खरात नावाचे अधिकारी सुरुवातीला आठ किंवा पंधरा दिवसाला बीड येथे येत होते मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ते दोन-दोन महिने बीड येथील जात पडताळणीच्या कार्यालयात फिरकत नाहीत. कोरोनाचा वेग कमी झाला तरी राज्यातील वैद्यकीय अभियांत्रिकी, बी फार्मसी आणि अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचा व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अनेक चकरा बीड येथील कार्यालयात माराव्या लागतात. अधिकार्‍यांची भेट घेऊन हे प्रस्ताव घाईगडबडीत समितीचे सदस्य असलेल्या दाणे यांच्याकडे औरंगाबादला पाठवावे लागते. वास्तविक पाहता दाणे आणि सदस्य सचिव असलेले मढावी हे दोन्ही अधिकारी अध्यक्षा पाठोपाठ प्रभारीच आहेत. त्यामुळे प्रभारी असले तरी अध्यक्षांनी बीड येथील जात-पडताळणीच्या कार्यालयात किमान पंधरा दिवसातून एकदा उपस्थिती लावून सुनावण्या घेऊन प्रलंबीत पडलेले जात पडताळणी प्रमाणपत्र निर्गमीत करावेत, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...