Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड बिनविरोध ग्रा.पं.चे श्रेय घेऊ नका,ब्रह्मगावकरांनी नेते, पक्षांना खडसावले, काटवटवाडी ग्रा.पं.संदीप क्षीरसागरांच्याच ताब्यात

बिनविरोध ग्रा.पं.चे श्रेय घेऊ नका,ब्रह्मगावकरांनी नेते, पक्षांना खडसावले, काटवटवाडी ग्रा.पं.संदीप क्षीरसागरांच्याच ताब्यात


काटवटवाडी ग्रा.पं.संदीप क्षीरसागरांच्याच ताब्यात; नवनिर्वाचित सदस्यांचा खुलासा
बीड (रिपोर्टर)- गावच्या सर्वांगीण विकासासाठी मौज व ब्रह्मगावातील जनतेने ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध केली असून या नव्या सदस्यांचा आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा नेत्याचा कसलाही संबंधत नसल्याचे पत्रक मौज-ब्रह्मगावातील नागरिकांनी काढले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे श्रेय कुठल्याही नेत्याने घेऊ नये, असा स्पष्ट खुलासा पत्रकाद्वारे करण्यात आला आहे तर तिकडे काटवटवाडी ग्रामपंचायत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाची असल्याचा खुलासा नवनिर्वाचित सदस्यांनी केला आहे.


बीड जिल्ह्यात 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असून यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून येत आहेत. बीड तालुक्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्यानंतर सदरच्या ग्रामपंचायती आपल्या गटाच्या असल्याचे पत्रक काही नेत्यांकडून काढले जात आहेत. याबाबत संबंधित गावकर्‍यांनी खुलासा काढून आमचा कुठल्याही पक्षाशी अथवा नेत्याशी संबंध नसल्याचे मौज-ब्रह्मगाव ग्रुप ग्रामपंचायतीने पत्रकाद्वारे केला आहे. पुढे ते पत्रकात म्हणतात, गेल्या अनेक वर्षांपासून या ग्रामपंचायतीमध्ये राजकीय संघर्ष व्हायचा, संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष या ग्रामपंचायतींकडे लागून असायचे. अतिसंवेदनशील म्हणूनही याकडे पाहितले जायचे परंतु हा संघर्ष कुठे तरी थांबला पाहिजे, मिटला पाहिजे म्हणून सर्व गावकर्‍यांनी एकत्रित बसून दोन गटांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायत बिनविरोध काढली. त्यामध्ये कोणत्याही नेत्याने अथवा पक्षाने श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वसंत अप्पा डावकर, माणिकराव डावकर, अप्सर पठाण, भाऊसाहेब डावकर, संदीप डावकर, सतीश डावकर, ज्ञानेश्‍वर डावकर, कैलास डावकर, सुंदर मिसाळ, रुद्रा मिसाळ, मुरली मिसाळ, राम खराडे, वसंत खराडे, हरिश खराडे, बळवंत डावकर, भीमा थोरात, मारुती शिंदे, अमोल डावकर, मच्छिंद्र डावकर, अंगद डावकर, नागोराव डावकर, श्रीराम पुरी, श्रीकृष्ण डावकर, अजिंक्य डावकर, प्रकाश डावकर, शरद डावकर, अजिंक्य डावकर, राहूल डावकर, भागवत डावकर, संजय डावकर, रविंद्र डावकरसह आदींनी केले आहे. तर राजूरी प्र. मौजे काटवटवाड ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे यात सर्वानुमते ग्रामपंचायत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देण्यात आली असून सुरुवातीचे अडीच वर्षे आ. संदीप क्षीरसागर यांच्या गटाकडेच सरपंचपद राहील, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु काहींनी चुकीच्या पद्धतीने वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशीत करत ग्रा.पं. ताब्यात घेतली आहे, असे सांगत आहेत. मौजे काटवटवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे श्रेय कोणी घेऊ नये, सदरची ग्रामपंचायत संदीप क्षीरसागरांच्या ताब्यात असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आशाबाई खोड, शिवाजी पिंगळे, मंगल खरसाडे यांनी म्हटले असून या वेळी पॅनलप्रमुख बळीराम जानवले, संदीप पाखरे उपस्थित होते.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

माजलगावमधील दोघांचे अंबाजोगाईत मृतदेह

एकाचा पाण्यात बुडून मृत्यू तर दुसर्‍याचा कोरड्या विहिरीत आढळला मृतदेहअंबाजोगाई (रिपोर्टर)- स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या तळ्याच्या पाण्यात बुडून ३८...