बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाला आज 709 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. या अहवालात 675 जण निगेटिव्ह आले असून 34 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बीड शहरातील 12 रुग्ण आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. सध्या तरी केवळ शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. आज आलेल्या अहवालात एकूण 34 जण बाधित आढळून आले असून त्यापैकी तब्बल 12 जण हे बीड शहरातील आहेत. त्यापाठोपाठ आष्टी 7, अंबाजोगाई 4, माजलगाव 3, केज 2 तर पाटोदा, परळी, गेवराई येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.