Saturday, January 23, 2021
No menu items!
Home बीड कलेक्टरांच्या जमावबंदी आदेशाला केराची टोपली गर्दी जमवायला प्रशासनाचीच मुक संमती

कलेक्टरांच्या जमावबंदी आदेशाला केराची टोपली गर्दी जमवायला प्रशासनाचीच मुक संमती

बीड (रिपोर्टर)-कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी 31 जानेवारीपर्यंत बीडमध्ये जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मात्र सध्या बीड शहरासह जिल्ह्यात धुमधडाक्यात लग्न होत आहेत. मोर्चेही हजारोंच्या संख्येने निघत आहेत. या मोर्चांना प्रशासनाकडून परवानग्या दिल्या जात नसल्या तरी आयोजकांवर कुठलेही गुन्हे दाखल होत नाहीत. त्यामुळे कलेक्टरांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असून प्रशासनाकडूनच गर्दी जमवायला मुकसंमती मिळत असल्याचे पहावयास मिळते.


बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढत आहेत. त्याला आटोक्यात आणण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मास्क वापरणेही तेवढेच महत्वाचे असताना बीड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांना कुठलीही परवानगी प्रशासन देत नसले तरी हजारो लोक एकत्र येत आहेत. मोर्चेही हजारोंच्या संख्येने काढत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला जातो. बीड जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मनाई आदेश लागू केलेले असतानाही मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊन लोक कोरोनाला आमंत्रण देतात. मात्र यावर प्रशासन कुठलीही दखल घेत नाही. सध्या शहरात प्रत्येक मंगल कार्यालयात हजारोंच्या संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येतात. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनच कलेक्टरांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...