Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड राज्य पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिन साजरा

राज्य पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिन साजरा


जेष्ठ पत्रकार काझी हयातुल्ला, रमेश बेदरकर पुरस्काराने सन्मानित
बीड (रिपोर्टर)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या अनुषंगाने स.मा.गर्गे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात दर्पणदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये गेवराई येथील पहिले पत्रकार काझी हयातुल्ला अणि बीडचे पहिले वर्तमानपत्र वितरक रमेशअप्पा बेदरकर यांना यावर्षीचा दर्पणकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गर्गे वाचनालयाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक राजारामा स्वामी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि संस्थापक अध्यक्ष संतोष मानूरकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये माध्यमाची भूमिका या विषयावर माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे व्याख्यान झाले. त्यासोबतच याच कार्यक्रमामध्ये पत्रकारांच्या कुटुंबियातील महिलांसाठी सर्वरोग निदान आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये समाजाप्रती माध्यमाने अतिशय योग्य पद्धतीने आणि जबाबदारीने काम केल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. या कार्यक्रमाला माध्यमातील पत्रकार आणि वृत्तपत्र वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....