बीड (रिपोर्टर)- बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खजाना विहिर जवळील डॉ. खोसे यांच्या शेतात एका ३० वर्षीय मजुराचा आज सकाळी मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
परमेश्वर नारायण गव्हाणे (रा. चक्रधरनगर, बीड, वय ३० वर्षे) हा मजूर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. आज सकाळी खजाना विहिरीजवळील डॉ. खोसे यांच्या शेतामध्ये मजुराचा मृतदेह आढळून आला. याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी बीड ग्रामीणचे पीआय साबळे, बीट अंमलदार सोनवणे मस्के यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मजुराच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.