बीड (रिपोर्टर)- सध्या ग्रा.पं.निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून एका-एका जागेसाठी निवडणुका पार पडत असताना तालुक्यातील कोळवाडी ग्रामस्थ मात्र विकासासाठी एकत्र आले असून पुर्ण ग्रामपंचायतच त्यांनी बिनविरोध काढली आहे आणि त्यांना २०१८ -१९ साली स्मार्ट ग्राम हा पुरस्कार देखील मिळालेला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जिल्ह्यात वाहत असताना काही ठिकाणी विकासासाठी ग्रामस्थ एकत्र येत आहेत. तालुक्यातील कोळवाडी ही ६ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत बिनविरोध निघावी त्यासाठी गावातील तरुण एकत्र आले होते. त्यांनी घेतलेल्या बैठकीत संपुर्ण सदस्य बिनविरोध निवडले आहेत. यामध्ये वार्ड क्र. १ मधून प्रियंका तुळशीदास शिंदे, द्रोपदी अंकुश वाघमारे आकाश सुखदेव शिंदे, वार्ड क्र. २ मधून संजीवनी सोमीनाथ जाधव तर वार्ड क्र. ३ मधून लहू सुदाम शिंदे, उषाबाई गोरख जाधव यांना ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी बिनविरोध निवडून दिले आहे. कुठल्याही राजकीय पुढार्यांच्या लोभाला बळी न पडता गावकर्यांनी एकत्रित येऊन जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे, अशी माहिती कोळवाडी येथील तुळशीदास महाराज शिंदे यांनी दिली.