Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeबीडसिंदफणा नदी पात्रातील वाळू साठ्याचा शोध सुरू चव्हाणवाडीत सापडली ३५ ब्रास वाळू

सिंदफणा नदी पात्रातील वाळू साठ्याचा शोध सुरू चव्हाणवाडीत सापडली ३५ ब्रास वाळू


बीड/कुक्कडगाव (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी उच्छाद् मांडला असून वाळू माफियांविरोधात कारवाई करण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली. सिंदफणा नदीच्या पात्रातून विविध शिवारामधून वाळुचा अनाधिकृतपणे उपसा केला जातो. या वाळू माफियांविरोधात कठोर कारवाई केली जात नाही. गेल्या तीन दिवसांपुर्वी एका टिप्परने शेतकर्‍यास चिरडल्यानंतर वाळू माफियाच्या विरोधात संताप व्यक्त होऊ लागला. वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात होत असून चव्हाणवाडी परिसरात ३५ ब्रास वाळू महसूल विभागाला आढळून आली. या पात्रातील अन्य वाळु साठ्याचा शोध बीडचे महसूल प्रशासन घेत आहे.
गेल्या काही महिन्यांपासनू सिंदफणा नदी पात्रातून बेसुमार आणि अनाधिकृत वाळुचा उपसा सुरू आहे. या वाळु माफियांविरोधात पोलिस आणि महसूल प्रशासन कारवाई करत नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांना वाळु माफिया हाताशी धरून वाळुचा उपसा करत आहे. तीन दिवसांपुर्वी गेवराई तालुक्यात एका टिप्परने शेतकर्‍यास चिरडल्यानंतर वाळू माफिया ंविरोधात संताप व्यक्त केला जाऊ लागला. प्रशासनही कारवाई करण्यासाठी सरसावले आहे. बीडच्या महसूल विभागाने चव्हाणवाडी परिसरातील ३५ ब्रास वाळू जप्त केली. कोणीतरी वाळू माफियाने नदी पात्रातून रात्रीच्या दरम्यान वाळू उपसून साठा करून ठेवला होता. सदरील हा साठा महसूल विभागाच्या हाती लागला, तो जप्त करण्यात आला. अन्य काही ठिकाणी वाळूचा साठा आहे का? याचा शोध महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी घेत आहेत.
वाळू माफिया सापडत कसे नाहीत?
सिंदफणा नदीच्या पात्रातून रात्रीच्या दरम्यान जेसीबीद्वारे सर्रास वाळू उपसली जाते, वाळू कोण उपसतय, ती कुठे विकली जाते याची इत्यंभूत माहिती जवळपास अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना असते मात्र कारवाई का केली जात नाही? हा प्रश्‍न आहे. एखादी कुठे घटना घडली तरच प्रशासन जागे होते आणि छोटीमोठी कारवाई केली जाते, त्यानंतर पुन्हा आहे तीच परिस्थिती निर्माण होत आहे. वाळू माफियांविरोधात ठोस आणि कठोर कारवाई केली तर नक्कीच वाळू माफिया अनाधिकृतपणे नदीपात्रातून वाळू उपसणार नाहीत.

Most Popular

error: Content is protected !!