Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home महाराष्ट्र मुंबई नामांतराच्या प्रश्‍नावर एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढू -अजित पवारांनी

नामांतराच्या प्रश्‍नावर एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढू -अजित पवारांनी


पुणे (रिपोर्टर)- राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून पुन्हा एकदा औरंगाबादचं नामकरण करत संभाजीगर व्हावं अशी मागणी होत आहे. शिवेसना गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी करत असून दुसरीकडे कॉंग्रेसने मात्र याला विरोध दर्शवला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असं सांगितलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भूमिका मांडली आहे.
महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आलं. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले प्रकाश आंबेडकरांनी पुण्याचं नाव बदलण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, कोणी काय मागणी करावं हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढतं, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकरणाबद्दल बोलतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात घडल्या आहेत. अशा काळात एका शहराचा मुद्दा आला तर दुसर्‍या शहरांचाही उल्लेख होते. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागतं. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी टीकावी आणि विकासाला महत्व द्यावं ही शरद पवारांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करुन पुढे जात आहोत.
राष्ट्रवादीची सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांना चर्चा करुन निर्णय घेतली. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होईन ना मला, ना धड तुला, दे तिसर्‍याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...