१५३ कोटी ३७ लाख लवकरच तहसीलदारांच्या खात्यात जमा होणार
बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकसान भरपाई घोषीत केल्यानंतर पहिल्या टप्प्याचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर आता अंतिम टप्प्याचे अनुदान घोषीत झाले असून जिल्ह्याला १५३ कोटी ३७ लाख ६८ हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम लवकरच तहसीलदारांच्या खात्यावर जमा होणार आहे.
परतीच्या पावसाने राज्यामध्ये धुमाकूळ घातल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकसान भरपाई म्हणून सरसकट हेक्टरी १० हजार रुपये घोषीत केे होते. पहिल्या टप्प्याची रक्कम प्रत्येक तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर त्याचे वाटपही अंतिम टप्प्यात आले आहे. दुसर्या टप्प्यातील रकमेची घोषणा राज्य सरकारने केली आहे. बीड जिल्ह्यासाठी १५३ कोटी ३७ लाख ६८ हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम तहसीलदारांच्या खात्यावर जमा होणार आहे. मराठवाड्यासाठी १ हजार ३०३ कोटी रुपयांचा दुसरा आणि अंतिम हप्ता देण्यात आलेला आहे.