Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home बीड ‘समृद्ध गाव’ योजनेतील गावांच्या सरपंचासोबत जिल्हाधिकार्‍यांचा संवाद

‘समृद्ध गाव’ योजनेतील गावांच्या सरपंचासोबत जिल्हाधिकार्‍यांचा संवाद

‘समृद्ध गाव’ योजनेतील गावांच्या
सरपंचासोबत जिल्हाधिकार्‍यांचा संवाद
बीड (रिपोर्टर)- पाणी फाऊंडेशनच्या वतीने बीड जिल्ह्यातील १३० गावांचा संपुर्ण कायापालट करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि पाणी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गावातील जल व्यवस्थापनासोबतच शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे यासह गावांच्या विकासावर समृद्ध गाव योजनेतून भर दिला जातो. धारूर तालुक्यातील अकरा गावांच्या सरपंचांंसोबत जिल्हाधिकारी रेखावार हे आज संवाद साधून या गाव विकासाच्या योजना आखणार आहेत.
धारूर तालुक्यातील आमला, देवठाणा, हिंगणी बुद्रुक, व्हरकटवाडी, सिंगणवाडी, मोरफळी, अंजनडोह, जायभायेवाडी, कोळपिंप्री, कारी आणि आंबेवडगाव या गावांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी वॉटरकप योजनेत सहभाग नोंदवून गावातील पिण्याच्या पाण्याची अडचण दूर केली होती. त्यामुळे यावर्षी पाणी फाऊंडेशनने याच अकरा गावांची निवड समृद्ध गाव योजनेत केलेली आहे. या योजनेतून शेतीसाठी जल व्यवस्थापन, जमिनीचा पोत सुधारणे, सेंद्रीय शेती करणे, रासायनिक खतांपासून शेतकर्‍यांना दूर ठेवणे, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे यासह या अकरा गावांचा संपुर्ण कायापालट व्हावा त्यांचा विकास व्हावा यासाठी पाणी फाऊंडेशनचे शिनगारे हे या गावांना भेटी देऊन गावकर्‍यांच्या अडचणी सोडून विकास प्रकल्प राबवतात. त्यामुळे महसूल प्रशासनानेही या गावांचा विकास व्हावा या करिता स्वत: जिल्हाधिकारी रेखावार यांनी पुढाकार घेतला. आज पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी रेखावार हे वरील अकरा गावांच्या सरपंचांसोबत बैठक घेऊन विकासाचे प्रकल्प राबवताना येणार्‍या अडचणी, प्रत्येक गावांच्या सोबत त्यांची भौगोलिक परिस्थिती याबाबत बैठक घेऊन आवश्यक त्या ठिकाणी महसूल आणि पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना ते निर्देश देणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या या कल्पकतेमुळे पाणी फाऊंडेशनसोबत महसूल विभागही विकासाला हातभार लावेल.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...