बीड (रिपोर्टर)- जनावरांच्या गोठ्यामध्ये विज प्रवाह उतरल्याने एका ३३ वर्षीय तरुणाचा र्शाक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी आहेर वडगाव येथे घडली. या घटनेने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोठ्यावरील पत्र्यावर ठेवलेली पेंड काढत असताना अशोक राजेंद्र कदम (वय ३३, रा. आहेरवडगाव) या तरुणाला विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने सदरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे.