Saturday, January 23, 2021
No menu items!
Home कोरोना शुर मातेला सलाम..! गर्भातील छोटा सैनिक कोरोना योद्धा मातेला देतो प्रेरणा

शुर मातेला सलाम..! गर्भातील छोटा सैनिक कोरोना योद्धा मातेला देतो प्रेरणाजिल्हा रूग्णालयातील लॅब टेक्निशियन सोनी चव्हाण पोटात गर्भ घेवून करतात बाधितांची सेवा
कोरोना सुरू झाल्यानंतर अवघ्या तिसर्‍याच महिन्यात सोनी यांना झाली होती गर्भधारणा
चार वेळेस गर्भपात झाल्यानंतर चौथ्यांदा कोरोना काळातच राहिला गर्भ
बीड | रिपोर्टर
कोरोना लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वांनीच आपआपल्या परीने गरजुंची सेवा केली. विशेष म्हणजे या सेवेसाठी कोणालाही हाक देण्याची गरज पडली नाही. विशेष म्हणजे आरोग्य प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. भारताचेच नव्हे तर अख्ख्या जगाचे लक्ष आरोग्य विभागाकडे होते. चोहीकडे हाहाकार माजलेला असतांना एकच एक आशेची किरण म्हणजे आरोग्य विभाग आणि त्या आरोग्य विभागाने अपेक्षेच्या पुढे जावून कोरोना संसर्ग थांबवला. म्हणूनच आज आपले बीड सुरक्षित आहे. जर नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी कोरोना संदर्भाचे पथ्य पाळले तर नक्कीच कोरोना राहणारच नाही. आता तर लस उपलब्ध झालेली आहे. या कोरोना काळात अनेक कोरोना योद्धे समोर आले. हमखास जिल्हा रूग्णालयातील परिचारीका संदर्भातचे वृत्त प्रकाशित झाले. ज्यांनी कोणी कोरोना काळात सेवा दिली अशांना प्रेस माध्यमाने न्याय दिलेला आहे. परंतू असे अनेक घटक आहेत की, ते दुर्लक्षित आहेत. त्याचे उदाहरण पहायला मिळाले ते बीड जिल्हा रूग्णालयातील ब्लड लॅबमध्ये तेथील महिला कर्मचारी लॅब टेक्निशियन सोनी चव्हाण गेल्या आठ महिन्यापासून गर्भवती असल्याने पोटात गर्भ घेवून बाधितांची सेवा करतांना दिसून आले. एवढेच नव्हे तर या संदर्भात त्यांना विचारना केली असता त्यांनी स्वच्छ मनाने उत्तर दिले. गर्भातील छोटा सैनिकच मला या योद्धात लढण्याची प्रेरणा देत आहे.

बीड जिल्हा रूग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून साोनी चव्हाण गेल्या अनेक वर्षापासून काम पाहत आहेत. अशातच कोरोनाची सुरूवात झाली. आरोग्य विभागातील अनेकांनी आपल्या मुला बाळाच्या खातीर या आजारापासून व बाधितापासून लांब कसे राहावे याचे मार्ग शोधले तर काहींनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना युद्ध सर केले. या योद्धात सोनी चव्हाण यांनी सुरूवातीपासूनच सहभाग घेतला. जून महिन्यात सोनी यांना गर्भधारणा झाली. त्यांनी अशा परिस्थितीतही आपले कर्तव्य सोडले नाही किंवा कोणत्याही प्रकारची बहाने बाजी न करता आपले कर्तव्य सुरू ठेवले. पोटातील गर्भ बघता-बघता आज आठ महिन्याचे झाले. तरीही सोनी चव्हाण आजही कर्तव्यावर दुपारी १२ ते ४ ड्युटी करतांना दिसून येत आहेत. यापुर्वी त्यांना चार वेळेस गर्भधारणा झाली होती. परंतू काही कारणास्तव गर्भपात झाले. त्यांना बाळाची खुप अपेक्षा होती. ऐन कोरोना काळात पुन्हा गर्भधारणा झाली. त्यावेळी त्यांनी विचार केला आपण काही न करता चार वेळेस गर्भपात झाले. यावेळी या बाधितांच्या सेवेचे फळ नक्की मिळेल अशी अपेक्षा ठेवून मनातून बाधितांची सेवा केली. एवढेच नव्हे तर लॅब टेक्निशियन म्हणून गेल्या दहा महिन्यापासून रूग्णांचे स्वॅब घेण्याचे काम ते करत आहेत. त्यांच्या या कामाला सलाम!


खूप कष्टाने नोकरी लागली
मॉं जिजाऊ यांच्या कृपेने मला सरकारी नोकरी लागली. नोकरी लागण्यापुर्वी खूप मेहनत घेतली परंतू तीन वेळेस नोकरी लागूनही काही कारणास्तव रिकामे परतावे लागले. सुदैवाने मी या सेवेसाठी पात्र झाले. कोरोना काळात काही बहाना केला तर आपल्या नोकरीवर गदा येईल याची भिती होती. परंतू गर्भधारणा झाल्यानंतर पोटातील छोट्या सैनिकाने मला प्रेरणा दिली आणि मी जोमाने बाधितांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला. या रूग्णांच्या आशिर्वादाने आता आठ महिन्याचा गर्भ असून मी शेवटपर्यंत सेवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच कोरोना काळात केलेली सेवा ही व्यर्थ जाणार नाही. मलाच नव्हे तर सर्व कोरोना सैनिकांना याचे फळ मिळणारच.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...