Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home कोरोना कोरोना लसीकरणाचे जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्राय रन प्रात्यक्षीक परळीत कोविड लसीकरण सरावफेरीचा...

कोरोना लसीकरणाचे जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्राय रन प्रात्यक्षीक परळीत कोविड लसीकरण सरावफेरीचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ

बीड,वडवणीतही ड्रायरन प्रात्यक्षीक यशस्वी
परळी (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील कोविड लसीकरण सरावफेरीला जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी उपजिल्हा रुग्णालयात आरंभ करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांकडून समजून घेत लसीकरणाचे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ना.मुंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून लसीकरण कक्षाची फीत कापून पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना सराव फेरी दरम्यान लस देण्यास आरंभ करण्यात आला.
राज्यात आज ३० जिल्हे आणि २५ महानगपालिकांमध्ये लसीकरणाची सरावफेरी राबविण्यात येत आहे. लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामुग्री इत्यादी सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाली असून, याची प्रत्यक्ष पाहणी आज ना. मुंडे यांनी केली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. राधाकीसन पवार, डॉ. दिनेश कुरमे, डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ. संजय कदम, डॉ. अर्षद आदी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\

05


यावेळी लसीकरण केंद्रातील लस साठा, प्रतीक्षा कक्ष, लस दिल्यानंतर काही वेळ त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवले जाईल तो कक्ष या सर्व ठिकाणची ना. मुंडेंनी पाहणी केली. डॉ. माले यांनी लसीकरण सराव फेरी व त्यानंतर राबविण्यात येणार्‍या प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेतील महत्वाच्या टप्प्यांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी ना. मुंडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष दीपकनाना देशमुख, डॉ. विनोद जगतकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते. लसीकारणासाठी लोकांना प्रत्यक्ष आणणे, त्यांच्या मनातील भीती व गैरसमज दूर करून यशस्वी लसीकरण पार पाडणे हे आव्हान आरोग्य विभागासमोर असून, आरोग्य विभागाने पूर्वी कोरोनाचा जसा धैर्याने सामना केला त्याच प्रमाणे लसीकरणाचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...