बीड (रिपोर्टर)- एकीकडे कोरोनाच्या लसीकरणाचे प्रात्यक्षीक सुरु असताना दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे, आज आरोग्य विभागाला ५०५ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ४७५ जण निगेटिव्ह तर ३० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही बीड शहरात असून ती तेरा आहे. त्यापाठोपाठ आष्टी ६, अंबाजोगाई ५, केज ३, परळी २ तर धारूर तालुक्यात एक रुग्ण आढळून आला आहे.