बीड-नगर महामार्गावर पोखरी गावाजवळील घटना
आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यातील पांढरी येथील कानिफ भिमराव वांढरे वय ३८ वर्षे हे आपल्या गावाकडून घरी जात असताना पोखरी गावाजवळ पिक अप दुचाकीच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी व मुलगी या गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली आहे.
तालुक्यातील पांढरी येथील कानिफ वांढरे यांचा कुकुटपालन व्यवसाय असून ते दुचाकी क्रं. चक२३Aझ५१८० वरुन आपल्या गावाकडून पोखरी येथील घरी जात असताना पोखरी गावाजवळ जामखेड कडून नगर मार्गे जात असलेल्या पिक अप क्रं. चक१४ त९०१९ च्या धडकेत कानिफ वांढरे यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी ग्रामस्थानी व नातेवाईकांनी धाव घेत पत्नी सोनाली वांढरे ( वय ३० ),मुलगी संस्कृती वांढरे वय ९ वर्षे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मयत कानिफ वांढरे यांच्यावर पांढरी गावी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनाजी हंबर्डे,पो.कॉ.एस. आर. गुज्जर हे करत आहेत.