Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home बीड संबंध मानवजातीला जिवंत राहण्यासाठी बांबू लागवड करावीच लागेल - पाशाभाई पटेल

संबंध मानवजातीला जिवंत राहण्यासाठी बांबू लागवड करावीच लागेल – पाशाभाई पटेल

बीड येथे बांबू लागवड संवर्धन .. पृथ्वीरक्षण अभियानाच्या बैठकीत आवाहन

बीड (प्रतिनिधी) शेतकरी नेते माजी आमदार पाशाभाई पटेल यांच्या विद्यमाने बीड येथे बांबू लागवड.. पृथ्वीरक्षण अभियानाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शेती उत्पन्न वाढ व पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्यास उत्सुक असलेले प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक संस्था प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, पत्रकार, शेतीनिष्ठ शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी आदींसह सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांची या बैठकीस प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थिती होती. या बैठकीत पाशाभाई पटेल यांनी बांबू लागवडीचे फायदे विषद करत असताना बांबू लागवडच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे उत्पादन अन जगाला कार्बनच्या संकटातून वाचवणारे असल्याचे म्हंटले. या बैठकीला माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, निझाम शेख, अशोक हिंगे, कवडे सर, जाहेर पाटील, चंद्रकांत फड, दत्ता जाधव, किरण बांगर, धनंजय गुंदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड शहरातील जिजाऊनगर येथील बंशीधर सभामंडप येथे या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पाशाभाई पटेल यांनी बांबु लागवडीबाबत इतमभूत माहिती दिली. बांबू हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे झाड हे बांबू आहे. जगाचा विनाश तापमान वाढीतून टाळायचा असेल तर झाडं लावणे आवश्यक आहे. हे झाड बांबू असेल तर लागवड करणाऱ्याच्या फायद्यासह पर्यावरणाचे रक्षण होईल. मानव जात वाचवायची असेल तर बांबू लागवडीशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. बांबू लागवडीतून वार्षिक एकरी 1 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते हे त्यांनी आकडेवारी सांगत शेतकऱ्यांना समजून सांगितले.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...