Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home क्राईम अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले, एलसीबीची कारवाई

अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले, एलसीबीची कारवाई

बीड (रिपोर्टर)- सध्या वाळू माफियाने उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात एकही शासकीय टेंडर नसताना सर्रासपणे नदी पात्रातील वाळुचा उपसा होतोय. बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर स्थानीक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.
तांदळवाडी शिवारातील तुपे वस्ती जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. त्यामध्ये एक ब्रास वाळू होती. चालक प्रदीप भास्कर रकटे (रा. आहेर चिंचोली) याला ट्रॅक्टरसह पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तर दुसरी कारवाई पेंडगाव ते तांदळवाडी या रोडवर एक ट्रॅक्टर पकडला. त्यातही एक ब्रास वाळू होती. चालक भाऊसाहेब रामनाथ यमगर (रा. शहाजानपूर (ता. गेवराई) याला ट्रॅक्टरसह पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावरही बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय गोसावी, हवालदार खेडकर, पोलिस नाईक कदम, गायकवाड, शिंदे, दुबाले, हरके यांनी केली.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...