Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा, एकनाथ शिंदेंकडून जवानांचं कौतुक

गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा, एकनाथ शिंदेंकडून जवानांचं कौतुक

गडचिरोली : जिल्ह्यातील किसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवानांच्या कामगिरीचं कौतुक केलं. कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी 60च्या जवानांना यश आले. यासाठी पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, तसेच सी 60चे कमांडो आणि चमूचे अभिनंदन, अशा भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या आहेत. (Five Naxalites killed in Gadchiroli)

उपविभाग धानोराअंतर्गत पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील या जंगल परिसरात पोलीस अधीक्षक गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सी 60चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवताना हल्ला झाला. घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. गडचिरोलीतल्या किसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

रविवारी संध्याकाळी जवळपास चार वाजताच्या सुमारास किसनेलीच्या जंगलात सी -60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. ही चकमक अद्यापही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सी- 60 कमांडोंनी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ही कारवाई केली. या अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!