Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home बीड केज 50 हजाराची लाच घेताना तलाठ्यासह सहायकास रंगेहात पकडले

50 हजाराची लाच घेताना तलाठ्यासह सहायकास रंगेहात पकडले

केज – 50 हजाराची लाच घेताना तलाठ्यासह सहायकास केज तहसील आवारात रंगेहात पकडल्याची घटना आज दुपारी घडली.बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी दाखविण्यासाठी या तलाठ्याने 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती सहाय्यकाकडून 50 हजार रुपये स्वीकारताना ‛एसीबी’च्या पथकाने रंगेहाथ पकडले. बीडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाडवी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. दोघा लाचखोराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तलाठ्यासह सहाय्यकास बीडच्या ‛एसीबी’च्या पथकाने येथील तहसीलच्या आवारातील टाकळी सजाच्या (अनधिकृत) कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पडकले आहे. दयानंद शेटे (वय 50 ) असे लाचखोर तलाठ्याचे तर सचिन घुले (वय 31)असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...