Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home क्राईम नोकरीचे आमिष दाखवून ३१ हजाराला फसवले

नोकरीचे आमिष दाखवून ३१ हजाराला फसवले

बीड (रिपोर्टर)- तुम्हारे लिए हमारे पास जॉब है, तुमको भेजी गई लिंकपर तुम्हारा पुरा फॉर्म भरो, असे म्हणल्यानंतर फिर्यादीने ती लिंक ओपन करताच ३१ हजार रुपयांचा दणका फिर्यादीला बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काल ग्रामीण पोलिसात त्याने तक्रार दाखल केली.
सतीश बाबासाहेब शिंदे (वय ३७ वर्षे) यांना दि. ११ नोहेंबर २०२० रोजी एका महिलेचा ९६३९०८५९२६ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता. तुम्हारे लिए हमारे पास जॉब है, तुमको भेजी गई लिंकपर तुम्हारा पुरा फॉर्म भरो, असे म्हणून त्यांना एक लिंक पाठविण्यात आली होती. सदरील फॉर्म भरण्याची फि केवळ २६ रुपये आहे, असे सांगण्यात आले होते. त्यावेळी शिंदे यांनी ती लिंक ओपन करून फॉर्म भरण्यास सुरुवात केली, तो फार्म भरत असताना त्यांच्या क्रेडिट कार्डावरून ३१ हजार रुपये गायब झाल्याचे त्यांना कळाले. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी त्यांनी बीड ग्रामीण पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचा पुढील तपास पोलिस निरीक्षक साबळे करत आहेत.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...