Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड जिल्ह्याला डॅमेज तलावांचा विळखा

जिल्ह्याला डॅमेज तलावांचा विळखा


महाराष्ट्र राज्यातील स्थापना झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्‍न होता तो म्हणजे पाणी. यासाठी 1960 च्या दशकात मोठ्या प्रमाणात तलावाची निर्मिती करण्यात आली. त्या काळात शासनाकडे आर्थिक तुटवडा असला तरी त्या काळातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी इमाने इतबाराने कामे करून कमी पैशात दर्जेदार कामे दिली. त्यानंतर 1970 साली दुष्काळासारखे वातावरण निर्माण झाले. वाढती लोकसंख्या लक्षात घेता राज्य शासनाला तलाव निर्मिती करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील अनेक भागात 1970-75 साली मोठ्या प्रमाणात तलाव तयार करण्यात आले. लोकसंख्या वाढत गेली, तलाव वाढत गेले, मोठे व मध्यम प्रकल्प तयार झाले. त्यानुषंगाने आज जिल्ह्यात हजारो पाझर तलाव शंभरच्या आसपास लघु सिंचन तलाव मध्यम मोठे प्रकल्प 25 अशा प्रकारे गाव तलाव, सिंचन तलाव तयार करण्यात आले. 1970 च्या दशकात तयार केलेेले तलाव आजही ग्रामस्थांची तहान भागवित आहे. राज्य शासनाने मध्यम व मोठे तलाव यांच्या देखभाल दुरूस्तीची तरतूद केलेली आहे. म्हणून आजही हे तलाव सुसज्ज स्थितीत दिसून येतात. परंतू छोटे तलाव यांना देखभाल दुरूस्ती नसल्याने जिल्ह्यातील हजारो तलाव डॅमेज अवस्थेत असून या तलावापासून भविष्यात शेतकर्‍यांना मोठा धोका होण्याची संभावना टाळता येणार नाही. या साठी स्वत: प्रशासनानेच पुढाकार घेण्याची गरज असून या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने जिल्ह्यातील काही तलावांचे सर्व्हेक्षण केले दरम्यान तलावच धोक्यात नव्हे तर बीडपासून अवघ्या 12 कि.मी.च्या अंतरावर असलेल्या खापरपांगरी गावाची तलावामुळे अत्यंत भयान अवस्था झालेली दिसून आली. विशेष म्हणजे खापरपांगरी गावाचे पुर्नवसन न करता तलावात पाणी कसे सोडण्यात आले? तो तलाव कसा सुरू करण्यात आला? या सर्व बाबींची चौकशी करण्याची गरज असून त्या गावातील अनेक शेतकर्‍यांची जमीन तलावात गेलेली आहे. त्या गावातील ग्रामस्थांकडून त्या काळात संमतीपत्र लिहून घेवून त्यांना मोबदल्याच्या नावावर 1 हजार रूपये रोख देण्यात आले. उर्वरित जमिनीची रक्कम आपल्यास्तरावर संबंधित कार्यालयाकडून आपण घ्यावी अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. ज्याअर्थी त्या काळात शिक्षणाची कमी होती असे भोळसर शेतकरी स्वत:च्या जमिनीचा मोबदला कसा वसुल करणार? याकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने त्या गावाचे पुर्नवसन तर झालेच नाही शिवाय शेतकर्‍यांना मोबदला मिळाला नाही. 7/12 वरील सर्वच जमीन पाण्यात गेल्याचे दाखवण्यात आले. हे शेतकरी आजही जमीनीच्या मोबदल्याच्या प्रतिक्षेत असून आता तरी प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर यंदा सारखा पाऊस झाला तर खापरपांगरी गावातील ग्रामस्थांना मोठा धोका होणार यापुर्वीच प्रशासनाने पुन्हा एकदा त्यांच्या पुर्नसवनाचा विचार करावा.

जिल्ह्यातील अनेक तलावाची अवस्था बिकट झालेली आहे. तलावाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे आल्याने भिंतीच्या आतून झाडाची मुळे तलावात शिरतांना दिसतात. या भिंतीतून पावसाळ्यात पाण्याचा पाझर होतो. म्हणून या भिंती किती मजबूत आहेत दिसून येतात. अनेक ठिकाणी संबंधित विभागाचे अभियंता स्वखर्चाने या भिंतीवरची झाडे काढून घेतांना दिसून येतात. देखभाल दुरूस्तीसाठी निधी नसल्याने मोठी देखभाल दुरूस्ती दिसली तरी नाही दिसल्या सारखे करावे लागते. त्या परिसरातील ग्रामस्थ जीव मुठीत घेवून आपले जीवन जगतांना दिसून येतात. संबंधित ग्रामस्थांना तलाव कोणत्या विभागांतर्गत बांधलेले आहेत याची माहिती नसल्याने कोणी तक्रारही करायला येत नाही. त्यानंतर तलावाच्या सांडव्याकडे पाहिले तर पन्नास वर्षापुर्वी बांधलेले सांडवे आजही सेवा देत असले तरी धोका कधी देतील हे सांगता येत नाही. जर सांडव्यामुळे दुर्घटना घडली तर हजारो एक्कर शेतकरी पाण्याखाली जावून शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसू शकतो. शिवाय नदीच्या कडेला असलेल्या ग्रमास्थांचे जीवही धोक्यात येतील. एकंदरीत जिल्हा डॅमेज तलावाच्या विळख्यात असून प्रशासनाने आपल्यास्तरावर पुढाकार घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात सर्व्हेक्षण करून ज्या तलावांना दुरूस्ती अत्यंत गरजेची आहे अशा तलाव किंवा बंधारे यांना प्राधान्य देवून टप्याटप्याने निधी मागणी करून देखभाल दुरूस्तीसाठी प्रशासनानेच पुढाकार घेण्याची आवश्यकता
तलावाच्या देखभाल दुरूस्ती सर्व्हेक्षणा सोबत संबंधित तलावा शेजारी असलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज; अनेक ग्रामस्थांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने व गावाचे अर्धवट पुर्नवसन यात अख्खे गाव उद्वस्त
जर देखभाल दुरूस्ती झाली नाही आणि पाऊस जास्त प्रमाणात झाले तर जिल्ह्यात भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
अनेक गावातील संपर्क तुटतील; जिल्हा तलावाच्या विळख्यात येण्याची शक्यता, ग्रामस्थांनी स्वत:च्या शेतात घर बांधुन
गाव सोडले, गावातील अनेक वाडे,
घरांची झाली पडझड
विशेष म्हणजे गावाच्या शंभर फुटावर तलाव असतांना त्या गावाचे पुर्नवसन न करता तलाव सुरू कसे केले, चौकशीची गरज; अनेक ग्रामस्थांना तक्रार कोठे करायची? कार्यालयच माहित नाही
तलावात जमीन गेली एक एक्कर परंतू सातबारावर पाच एक्करची नोंद असेल तर परस्परच पाच एक्कर जमीन पाण्यात गेल्याचे दाखविल्याने शेतकरी अडचणीत
जिल्ह्यातील अनेक तलावांच्या भिंती धोक्यात, भिंतीवर झाडांचे साम्राज्य, तलावाचे सांडवे तब्बल 50 वर्षापुर्वीचे भविष्यात धोकादायक ठरणार; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज
गावातील ग्रामस्थ गेले शेतात
खापरपांगरी गावासमोरील तलाव अवघ्या शंभर मिटरवर दिसून येतो. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तलावाचे पाणी कडेच्या घरात शिरले. अनेक घरांची पडझड झाली. वाडे, घरे उद्वस्त झाली. काही शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतात घरे बांधून राहण्यास सुरूवात केली. गावामध्ये काही बोटावर मोजण्या इतकेच घरे आहेत. त्या घराची पडझड झाली असल्याचे दिसून येते.

पुर्नवसनासाठी जागा भेटली
नसल्याची मिळाली माहिती
1970 साली खापरपांगरी शिवारात तलाव तयार करण्यात आले. शेतकर्‍यांकडून संमतीपत्र लिहून तलावाची बांधणी झाली. तलाव पासून खापरपांगरी गावाला धोका होणार याची प्रशासनाला माहिती होती. म्हणून प्रशासनाने पुर्नवसनासाठी प्रयत्न सुरू केले. परंतू पुर्नवसन आत्तापर्यंत का झाले नाही? हे मात्र ग्रामस्थ सांगू शकले नाही. एका ज्येष्ठ ग्रामस्थानी माहिती दिली की, पुर्नवसनासाठी जागा मिळाली नसल्याने पुर्नवसन झाले नाही. जर पुर्नवसन करणे गरजेचे होते तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष का दिले नाही? पुर्नवसन न करताच तलाव सुरू कसे करण्यात आले? तसेच त्या शेतकर्‍यांच्या जमिनीचा मोबदला यासाठी प्रशासनाने पाठपुराववा का केला नाही? तसेच ज्या शेतकर्‍यांची एक एक्कर जमीन पाण्यात गेली तर मग 7/12 वरील सर्व जमीन पाण्यात गेल्याचे कसे दाखविण्यात आले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

शेकडो कोटी निधीची गरज
जिल्ह्यात छोटे तलाव व कोल्हापूरी बंधारे यांची संख्या हजार पेक्षा जास्त आहे. त्यानंतर सिंचन तलाव, गाव तलाव असे अनेक तलाव जे 1970 च्या दशकता बांधण्यात आले होते. या तलावापासून आजही ग्रामस्थांना आधार मिळतो. परंतू देखभाल दुरूस्तीसाठी निधीची तरतूद नसल्याने हे तलाव डॅमेज झालेले दिसून येतता. यासाठी शेकडो कोटी निधीची गरज आहे. परंतू कोरोनातून आत्ताच बाहेर पडल्याने एवढा मोठा निधी एकत्रित देणे शक्य नाही. म्हणून ज्या तलावाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे अशा तलावांना प्राधान्य देवून टप्याटप्याने निधीची मागणी केली तरच या तलावाचे पुढचे भविष्य टिकून राहणार नसता तलाव ही नष्ट आणि आर्थिक फटका शेतकर्‍यांना सोसावा लागणार.

जिल्ह्यातील तलावांच्या सर्व्हेक्षणाची गरज
जिल्ह्यात अनेक तलावांची अवस्था देखभाल दुरूस्ती अभावी बिकट झालेली आहे. यासाठी प्रशासनाने स्वतंत्र समिती नेमणुक करून जिल्ह्यातील तलावांचे सर्व्हेक्षण करून तलावाची देखभाल दुरूस्तीसाठी प्रशासनाला अहवाल द्यावा. तसेच तलावात ज्या शेतकर्‍यांच्या जमीनी गेलेल्या आहेत किंवा तलावामुळे शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होतात या सर्व बाबी या सर्व्हेक्षणात घेणे गरजेचे आहे. तलावाच्या देखभाल दुरूस्ती सोबतच शेतकर्‍यांचे प्रश्‍नही मार्गी लागले तर गेल्या महिनाभरापुर्वी बीड पाटबंधारे विभाग बीड या कार्यालयात शेतकर्‍याने केलेली आत्मदहन पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून आपल्यास्तरावरच प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....