Saturday, January 23, 2021
No menu items!
Home आरोग्य & फिटनेस राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी घेणार महत्त्वाची बैठक

राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी घेणार महत्त्वाची बैठक


मुंबई (रिपोर्टर)-परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांच्या पथकाने पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन कोंबड्यांना ताब्यात घेतले होते.राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत चर्चा करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांच्या पथकाने पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन कोंबड्यांना ताब्यात घेतले होते. याचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणीच्या अहवालामध्ये या कोबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असे स्पष्ट झाले. परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांपूर्वी 800 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. या कोंबड्या बर्ड फ्लूनेच दगावल्याने निष्पन्न झाले. यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...