Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home Uncategorized दगडाने ठेचून तरुणाचा खून, चर्‍हाटा रोडवर घडली रात्री घटना, अज्ञात मारेकर्‍याच्या अटकेसाठी...

दगडाने ठेचून तरुणाचा खून, चर्‍हाटा रोडवर घडली रात्री घटना, अज्ञात मारेकर्‍याच्या अटकेसाठी एलसीबीचे पथक रवाना


चर्‍हाटा रोडवर घडली रात्री घटना, अज्ञात मारेकर्‍याच्या अटकेसाठी एलसीबीचे पथक रवाना
मृतदेहा शेजारी मयताची मोटारसायकलही आढळली

बीड (रिपोर्टर)- चर्‍हाटा रोडवर एका 32 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याचा खळबळजनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या तरुणाचा खून कोणी आणि कुठल्या कारणावरून केला. याचा तपास पोलिस करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. मृतदेहाच्या बाजुला मयताची मोटारसायकल आढळून आली. ज्या दगडाने खून करण्यात आला तो दगडही पोलिसांना दिसून आला.
प्रकाश गायकवाड (वय 32, रा. अंकुशनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री त्याने घरी अंडे आणून दिले होते. तू भाजी करून ठेव, असे बायकोला सांगून तो रात्री आठच्या दरम्यान घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी आलाच नाही. आज सकाळी अंकुशनगरमधून जाणार्‍या चर्‍हाटा रोडजवळ त्याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत, शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. या वेळी त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. मयत प्रकाश गायकवाड हा गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल लाईट हाऊसमध्ये मजुरी करत होता. त्याचा खून नेमका कोणी आणि का केला? हे मात्र अद्याप समजू शकले नाही. अज्ञात आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये सुरू होती. या घटनेने चर्‍हाटा परिसरामध्ये एकच खळबळ उडलाी असून मयताच्या बाजुला त्याची चप्पल आणि मोटारसायकल आढळून आली आहे.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...