Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home संपादकीय भाग 2- टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र जिजाऊंनी तेव्हा कुठली पेन किलर...

भाग 2- टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र जिजाऊंनी तेव्हा कुठली पेन किलर घेतली असेल

जिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग 2
गणेश सावंत
9422742810

ताण कोणाला नाही, तणाव कोणाला नाही, टेंशन कोणाला नाही, त्यावर मार्ग काढायचा असतो की, आयुष्य संपवण्याचा निर्णय घ्यायचा असतो, यावर आपण कालपासून लिहित आहोत, बोलत आहोत, स्वराज्य निर्माण करताना राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांना जो ताण आला असेल, क्षणा क्षणाला जो तणाव अनुभवयास लागला असेल, जे टेंशन आले असेल त्याचा विचार आज केला तर तुमचे आमचे टेंशन त्या ताण तणावापुढे किती असेल, यावर आपण भाष्य करत आहोत. ज्या जिजाऊंना आपण माता मानतो, आदर्श मानतो त्यांच्याच मुशीत आणि कुशीत तुमचा-आमचा जन्म झाला असेल, तुम्ही-आम्ही वाढलो असू मग ताण-तणावाला आपण भीक का घालायची? त्यापुढे गुडघे का टेकायचे? याचा आता प्रत्येकाने विचार करायला हवा. जिजाऊ मॉसाहेब कर्तृत्व आणि नेतृत्व हे दोन्ही गुण एकवटलेल्या मातृत्वाची महान मुर्ती होत्या. मातृत्व नुसते जन्म देणारे नसते तर घडविणारे असते, त्याचे सर्वात दैदिप्यमान उदाहरण जिजाऊ मॉ साहेब आणि राजे शिव छत्रपती हे आहेत. याबाबत दुमत असण्याचं काहीच कारण नाही. त्याच जिजाऊंच्या आणि शिवबांच्या महाराष्ट्रात तुमचा आमचा जन्म झाला आहे. स्वराज्य निर्माण करताना या माता-पुत्राला कुठल्या ताण-तणावातून जावे लागले असेल याचा अंदाजही तुम्हा-आम्हाला नक्कीच नाही. तरीही तुम्ही-आम्ही तणाव आणि टेंशनचे नाव पुढे करत आपल्या आयुष्याची होळी करून घेतोय. जीवनाची होळी करतोय, हे दुर्दैव नव्हे का? राजमातांना राजमाता पद हे इतर राजांच्या राण्यांसारखं मिळालेलं नाही. ते मातृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वाच्या बळावर मिळालं. हे तुम्ही आम्ही म्हणणंही चुकीचं असेल. कारण त्यांचं कर्तृत्व हिमालयासारखं उंचीचं आणि त्यांचं दातृत्व सागरासारखं अथांगच. म्हणूनच


पारतंत्र्याविरोधात
चीड

त्यांना होती. महाराष्ट्राच्या मातीबद्दल आणि महाराष्ट्रातल्या माणसांबद्दल त्यांना प्रेम होतं. धर्म मार्तंडांच्या रुढी-परंपरांविरोधात राग होता. मात्र हा राग, हा संताप टेंशन आणि तणावाच्या नावाखाली आत्मघात करण्यासाठी त्यांनी वापरला नाही तर स्वराज्य कसा निर्माण होईल, स्वराज्य निर्माण करण्यासाठी माणसे कसे उभा करता येतील यासाठी त्यांनी संभाळून ठेवला. जिथे मराठ्यांच्या निधड्या छात्या आणि त्यांची मनगटे, मोगलशाही, आदीलशाही, निजामशाही आणि औरंगजेब यांच्या भौतिक सुखाच्या शान-शौकतीच्या रक्षणासाठी झिजायच्या. जिथे मराठे सरदार या शाह्यांना मुजरे घालायचे तिथं जिजाऊ मॉ साहेबांनी या पातशाह्यांना आव्हान देण्यासाठी तळहातावर प्राण घेऊन आपल्या मुलाला उभे करतात. तेव्हा जिजाऊ मॉ साहेबांना आपण आपल्या मुलाला संकटात घालतो याची आठवण झाली नसेल, त्या वेळेस त्यांना ताण-तणाव टेंशन आले नसेल का? या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी त्यातला तणाव आणि टेंशन हे अक्राळ-विक्राळ राक्षसासारखेच. थोडा विचार करा तणावाच्या नावाने आणि टेंशनच्या नावाने जो आत्मघाती निर्णय घेतला जातो अशांनी तर जिजाऊ मॉ साहेबांचं चरित्र वाचायलाच हवा. कुठल्या मातेला आपला पुत्र प्रिय नसतो, कोणती माता आपल्या पुत्राच्या केसा-केसाला आणि नखा नखाला जपत नाही, पाठिशी घालत नाही, आपल्या पंखाखाली घेत नाही परंतु जिजाऊ मॉ साहेब ही अशी एक माता होऊन गेली की, जिने अन्याय-अत्याचार करणार्‍यांची गर्दन छाटण्यासाठी तलवारीचे पाते लखलखीत ठेवावे, असे धैर्य व ध्येय प्रत्येक घासातून शिवबांना भरविले. हे आज ताण-तणावाची भाषा करणार्‍या महिला-मुलींना आवर्जून सांगावेसे वाटते. हे तर सोडा स्वराज्यासाठी आणि पतीला साथ देण्यासाठी याच मातेने साक्षात आपल्या माहेरच्या लोकांविरोधात बंड पुकारले. लखोजी जाधवांविरोधात तलवार उपसली ती स्वराज्यासाठी, सत्यासाठी. त्या वेळेस जिजाऊ मॉ साहेबांना काय वाटले असेल, आपल्या भाऊ बंधूंविरोधात, पित्याविरोधात तलवार उपसताना जिजाऊ मॉ साहेबांचं मन काय म्हणत असेल, त्या वेळेस त्यांना ताण-तणाव आला नसेल, टेंशन आला नसेल, मग त्यांच्या या टेंशनपेक्षा आज सासू-सुनेचे पटत नाही म्हणून आलेलं टेंशन, बाहेरच्या लव्ह लफड्यामुळे आलेलं टेंशन, नवरा-बायकोच्या कुरबुरीचं टेंशन कमी आहे की, जास्त आहे ओ याचा विचार का केला जात नाही? प्रतापगडच्या


पायथ्यापसला
तो थरार

आजही वाचला आणि पाहिला तर काळजात धस्स होतं. दिल्लीत बडी बेगमचा दरबार भरलेला असतो, महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांना जेरबंद कोण करणार? असा सवाल विचारला जातो, त्या वेळी एक्या बसनीला बोकड फस्त करणारा, लोखंडी पहारीला हाताने चारचा आकार देणारा बलदंड असा अफजल खान उभा राहतो आणि तो पानाचा विडा उचलतो, ‘मै लाऊँगा शिवा को पकडके’ असे अभिमानाने सांगतो, ही माहिती इकडे स्वराज्यात जिजाऊ मॉ साहेबांना समजते तेव्हा अफजल खानच्या क्रूरतेबद्दल संपुर्ण माहिती असलेल्या जिजाऊ मॉ साहेबांचे हाल काय झाले असतील, त्यांना काय वाटले असेल की आता हा स्वराज्यावर धावून येतोय, रयत सिली जाणार आणि छत्रपती शिवरायांना तो जेरबंद करणार, त्यावेळेस त्यांची मानसिकता काय असेल. त्यापुढे जात प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी राजे आणि अफजल खानाची भेट ठरते, शामियाना उभारला जातो, उद्या दुपारी भेट होणार असते, त्याची आदली रात्र जिजाऊ मॉ साहेबांची कशी गेली असेल, त्या मातेला झोप तरी आली असेल? उद्या माझा पोरगं बलदंड अशा राक्षसाला भेटायला जातोय, त्याची उंची, त्याची ताकद, त्याची भूमिका, त्याची क्रुरता आणि आपल्या मुलाची शारीरिक उंची या मधला फरक करताना जिजाऊ मॉ साहेबांना काय वाटत असेल. उद्या काय होणार, अफजल खानाच्या भेटीमध्ये शिवबा राजेंचं बरं-वाईट तर होणार नाही, असा विचार त्यांच्या मनात आला सेल का? आणि हा विचार आल्यानंतर आई म्हणून, माता म्हणून त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं नसेल का? त्यांना त्या रात्री क्षणोक्षणी किती ताण आला असेल, किती तणाव आला असेल, टेंशन ते काय असेल, डोकं दुखलं असेल, छातीत पेन केलं असेल, विचारांचं काहूर उठलं असेल, हुंदके आले असतील, डोळे पानावले असतील, धरणीमाय जागा देत नसेल, तो ताण-तणाव कसा असेल? मग त्या ताण-तणावातून मार्ग काढायचा, त्यासोबत संघर्ष करायचा, ताण-तणावाला पराजीत करायचे की स्वत:ला ताण-तणावाच्या आधीन देत पराभूत व्हायचे हा ज्याचा त्याचा विचार म्हणावा लागेल. जिजाऊ मॉ साहेबांनी धैर्य सोडलं नाही, संघर्ष करणं सोडलं नाही आणि यशाची पताका फडकवण्याचा निश्‍चयाचा महामेरू बहुजनाशी उद्धारू ही भूमिकाही सोडली नाही मग आज तणावाच्या नावाखाली टेंशनच्या नावाखाली ताणाला महत्व का देताय आणि स्वत:च्या हृदयात टेंशनचा बाण का मारून घेताय. शिवचरित्रातून आणि जिजाऊ मॉ साहेबांच्या चरित्रातून ताण-तणाव टेंशन यावर अनेक रामबाण उपाय सूचतात. मग ती आगर्‍याची सुटका असेल की, बाल शंभू राजांची मृत्यूची खोटी बातमी असेल, यातला तणाव किती तरी भयानक म्हणूनच ताण-तणावाला महत्व देण्यापेक्षा, टेंशनच्या नावाखाली आत्मघात करण्यापेक्षा टेंशनवर यश मिळवणे हे ध्येय ठेवा. जिजाऊ मॉ साहेबांनी तेव्हा कुठली पेन किलर घेतली असेल?


झंडू बाम तर नव्हता
डोकं दुखत असल म्हणून गोळीही नव्हती, अस्वस्थ वाटतय म्हणून बीपी चेक करायचे साहित्य नव्हते, त्या वेळेस होते फक्त ध्येय. आलेल्या संकटावर मात करण्याचा विश्‍वास आणि स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, रयतेसाठी झगडण्याचा ध्यास. आज तुम्हा-आम्हाला स्वराज्य निर्माण करायचं नाही, तलवारी घेऊन आक्रमण करायचं नाही, रात्री-अपरात्री शेकडो मैल न खाता पिता पायी चालायचं नाही, अखंड विश्‍वातल्या सर्व भौतिक सुखात तुम्ही – आम्ही असताना टेंशनला का महत्व देतोय आणि आत्महत्येसारखं पाऊल का उलतोय याचा प्रत्येकाने विचार करायला हवा आणि शिवचरित्रातून, जिजाऊ चरित्रातून मार्ग शोधायला हवा.
उद्याच्या अंकात
राजमातांनी सहन तरी कसे केले ताण-तणाव

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...