बीड (रिपोर्टर)- गेल्या काही दिवसांपासून बीड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्याचा आकडा 40 ते 50 च्या आसपास जात आहे मात्र आज बीडमध्ये केवळ 9 पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याचा आकडा 20 आला आहे.
आज आरोग्य विभागाला 603 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 583 जण निगेटिव्ह आले असून केवळ 20 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीडचे 9 तर अंबाजोगाई 3, वडवणी, माजलगाव, आष्टीचे प्रत्येकी 2 तर परळी आणि केजमध्ये केवळ एक रुग्ण आढळून आला आहे.