Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeसंपादकीयजिजाऊ जयंतीनिमित्त मॅरेथॉन अग्रलेख अंतिम भाग टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र राजमातेने...

जिजाऊ जयंतीनिमित्त मॅरेथॉन अग्रलेख अंतिम भाग टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र राजमातेने सहन तरी कसे केले? ताण तणाव

गणेश सावंत
9422742810

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेत रयतेचा राजा असा जगात कोणीही नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे तर राजमाता जिजाऊ मॉ साहेब चंद्र आहे. जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीला आणि मराठी माणसांना आदर्शाच्या प्रखर तसेच शितल प्रकाशासाठी अन्यत्र कोठेही जायची गरज नाही. आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जो तो तणावाचे नाव घेतो. टेन्शनच्या नावाने बोंब मारतो, घरात कोणी बोललं राग आला की तो तणावात जातो, टेन्शनमध्ये येतो अन् आत्महत्येचा मार्ग स्विकारतो, परिक्षेत मार्क कमी पडले तर आत्महत्या, प्रेमात अपयश आलं कर आत्महत्या, पित्याने मोबाईल दिला नाही कर आत्महत्या, शेतात पिकलं नाही कर आत्महत्या, सावकाराचं बँकेचं देणं झालं कर आत्महत्या, नवराबायकोचं भांडण झालं कर आत्महत्या अशा काही घटना घडल्या की टेन्शन आणि तणाव सातत्याने चर्चेत येतो. तणावात आणि टेन्शनमध्ये नशेच्या आहारी जातो आम्ही गेल्या तीन दिवसांपासून तुमच्या आमच्या टेन्शनपेक्षा जिजाऊ मॉ साहेबांचं टेन्शन किती होतं कसं होतं हे इतिहासाच्या साक्षीने सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आज या मॅरेथॉन अग्रलेखाच्या शेवटच्या भागात राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांनी टेन्शन आणि तणाव सहन तरी कसा केला असेल. हा प्रश्‍न आम्हाला पडला आणि त्यांच्या ताण तणावाच्या प्रकाश झोतातल्या काही घटना तुमच्या समोर मांडत आहोत. गेल्या दोन दिवसामध्ये जिजाऊ मॉ साहेबांचे टेन्शन अथवा त्यांच्या तणावाची कल्पना करा असं म्हणत आहोत. बहूतांशी जणांनी ती कल्पनाही केली असेल परंतू त्यांच्या तणावाची कल्पना सहन करण्याचा तणावही आपल्याला सहन होत नाही ना, आजची माता आपल्या मुलाला जपताना तिचं मातृत्व आणि दातृत्व दाखवते. पुत्र लष्करात किंवा आरमारात जाणार म्हणलं की आई नको नको म्हणते. लहान मुलाला एखादी आई प्रवासाच्या दरम्यान खिडकीत बसू नको, हात बाहेर काढू नको अशा सूचना देते. हे सर्व सांगत असतांना आजची आई ही कासावीस होते. परंतू त्याच ठिकाणी


जिजाऊ मॉ साहेब
आणि बाल शिवाजी

यांच्या इतिहासाकडे पाहितलं, कतृत्व कर्माकडे पाहितलं तर अनेक घटनाक्रम आजच्या आईला बरंच काही सांगून जाते. आजचे तणाव आणि टेन्शन घेवून फिरणार्‍या प्रत्येकाला संघर्षाची जाणीव करून देते. आजची आई मुलाला पदराखाली घेवून जीवानिशी प्रेम करते. पण जिजाऊ मॉ साहेबांनी शिवाजी राजांना करूण किंकाळ्या फोडणार्‍या स्त्रियांना वाचविण्यासाठी तलवार घेवून धावण्यास सांगितले. अत्याचारी राक्षसाचा निप्पात करण्यास सांगितले, हतबल झालेल्या पिडीत प्रजेचा वाता होण्यास प्रवृत्त केले. जिथे जिथे प्राणावर संकट होते तिथे तिथे मॉ जिजाऊंबरोबर फक्त त्यांचे पूत्र शिवबाच होते. आजच्या मातेसारखं जिजाऊंनी ते आपलं काम नाही असं म्हटलं नाही तर ते आपलंच कर्तव्य आहे असं सांगत शिवबांना डोळ्यात प्राण आणून फक्त जपण्याचं काम केलं नाही तर जिथं प्राणाला धोका आहे तिथं जाण्यासाठी उत्साह दिला, आशिर्वद दिले. तो तणाव किती असह्य असेल, त्यांनी तो सहन तरी कसा केला असेल. अफजलखानाच्या भेटीचा दिवस आई आणि पूत्राच्या प्रेमाचा विचार केल्यानंतर त्या दिवशीच्या तणावाची गोळा बेरीज करतानाही आज दमछाक होते. काल आपण त्या भेटीची आठण काढली, शिवाजीला जिंदा या मुडदा आणण्याचा विडा उचलणारा अफजल जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी आला त्या क्षणी जिजाऊ कशा तगमगत असतील. यमाचा रेडाच जणू दारात आल्याचे चित्र जिजाऊंना दिसत नसेल काय? त्या रात्री जिजाऊ झोपल्या असतील काय? असे एक ना अनेक प्रश्‍न यातून जेव्हा उपस्थित होतात तेव्हा जिजाऊंचा ताण तणाव तुमच्या आमच्या लक्षात येतो आणि त्या ताणतणावाची व्याप्तीही लक्षात येते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अशा महाकाय संकटाला सामोरे जाताना राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी येत असत त्यावेळी जिजाऊ माँसाहेबांना काय वाटत असेल. आपला पूत्र साक्षात मृत्यूच्या दाढेत जातोय त्याला दिर्घ आयुष्य आणि विजय होचा आशिर्वाद जिजाऊ माँसाहेब देत असतील परंतू त्यांचं मन काय म्हणत असेल. हृदयाचे ठोके किती वाढलेले असतील. डोळ्याच्या काटा पान्हवत असतील ना, ती वेळ आणि त्या क्षणी जिजाऊ माँसाहेबांना किती तणाव असेल. तो ताण कसा असेल, ते टेन्शन कसे असेल, जेव्हा राजमाता जिजाऊ माँसाहेबांना समजले आपला पूत्र दिल्ली दरबारी जात आहे, औरंगजेबाची भेट घेत आहे आणि सोबत नातू संभाजीही जात आहे तो दिवस कसा असेल,


औरंगजेबाच्या
दरबारातला तो थरार

आणि शिवाजी महाराजांची अटक वाचल्यानंतर आजही अंगावर शहारे येतात त्या थराराची साधी कल्पनाही केली तर आजही टेन्शन येते, तो काळ जिजाऊ माँसाहेबांना कसा पेलावला असेल. जिजामातेने हृदयात कशी कोंडली असेल ती घोर काळजी व काळजीच्या पोटातील सहस्र चिंता ? जो रणांगणात लढतो त्याची काळजी शौर्याच्या साहसात कुठे तरी हरवलेली असते . पण मागे जी माता असते तिचे काय ? जिजामातेने स्वत : च शिवबाला या रणांगणाच्या रस्त्यावर सोडले होते . कितीही तणाव झाला तरी त्यांना क्षणभरही ’ चुकले तर नाहीना ? ’ अशी शंका चाटून गेली नाही . माणसाला आयुष्यभरात जितका तणाव येत नाही तितका तणाव एके का सेकंदात यावा असा तो जीवनमरणाचे कित्येक प्रसंग राजमाता जिजाऊंच्या उभ्या आयुष्यात आले, त्यातला औरंगजेबाच्या दरबारातला हा सर्वात मोठा प्रसंग शिवाजीराजांनी पाताळयंत्री क्रू र कारस्थानी औरंगजेबाला भेटण्यासाठी युवराज संभाजीराजांना घेऊन दिल्लीला प्रयाण केले तेव्हा राजमातेच्या हृदयाला काळजीचे शेकडो बाभळीचे काटे बोचले असतीलच , पण औरंगजेबाने राजांना कैद केले आहे असे समजताच काय झाले असेल ? ज्याने त्याचा मोठा भाऊ दाराचे डोळे फोडून धिंड काढली आणि त्याचे मुंडके कापून तबकात आणण्यास लावले त्या औरंगजेबाच्या कैदेत पुत्र शिवाजी आणि थोरला नातू संभाजी ! जिजामातेच्या स्वप्नात कोणत्या भेसूर चेटकिणी नाचल्या असतील ? भेसूर भुते गडगडाट करीत हसली असतील ? याचा विचार आज केला तर आजही अंगाअंगात भुते संचारल्यासारखे तणाव टेन्शन थया थया नाचतात. औरंगजेबाच्याताब्यात असलेल्या राजेंना आणि संभाजींना तिथं कैदेत जेवण कसं मिळत असेल, त्यांना वागणू कशी दिली जात असेल या आठवणींनीही जिजाऊ माँसाहेबांना काय वाटत असेल. या


तणावापुढे तुमचा
आमचा तणाव

कमी आहे की जास्त आहे, तब्बल शंभर दीडशे दिवसांहूनही अधिक दिवस शिवाजीराजे स्वराज्यात नव्हते, रायगडावर नव्हते त्यावेळी त्या तणावात त्या टेन्शनमध्ये जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्यही सांभाळलेच ना, मग परिक्षेत मार्क पडले नाहीत, शेतात पिकले नाही, कर्जबाजारी झालो म्हणून आयुष्याचं रणांगण सोडणं चुकीचं आहे. संघर्ष करावा लागेल आणि संकटावर मात करावी लागेल. शिवाजीराजांनी रायगड सोडल्यानंतर 1 9 1 दिवस लोटले आणि शिवाजीराजे अचानक रायगडावर त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले ! राजमातेच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस होता . हत्तीच्या पायाएवढी काळजी त्या दिवशी आनंदाचा कल्लोळ झाली . रायगडाचे आनंदवनभुवन झाले . जिजामातेच्या खडतर आयुष्याचे शिवरायाच्या राज्याभिषेकदिनी सोने झाले !! स्वराज्याच्या लढाईतील सर्वात मोठ्या चिंता व खस्ता सहन केलेल्या जिजामातेचे मन शांतरसात न्हाले . कृतकृत्य जीवनाची समाप्ती करून राजमाता स्फूर्तिरूपाने उरल्या आहेत . श्री शंकराने ज्याप्रमाणे हलाहल कंठात धारण केले आणि अमृत इतरांसाठी ठेवले , त्याप्रमाणे राजमातेने त्या बिकट काळातील भयानक तणावाचे हलाहल ’ स्वत : धारण केले आणि शिवरायाच्या जीवनाचे अमर अमृत तुम्हा आम्हा सर्वांसाठी ठेवले . आता कुणी म्हणेल काय की , मला तणाव आहे- टेन्शन आहे ?

Most Popular

error: Content is protected !!