बीड (रिपोर्टर):- घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लॉक तोडून चोरून नेल्याची घटना रविवारी घडली असून याबाबत बाळकृष्ण खोड यांनी शिवाजीनगर पोलीसात तक्रार दिली आहे. बाळकृष्ण खोड हे आपल्या सासरवाडीला त्यांची दुचाकी क्र. एम.एच.२३ ए.एल.८५३६ घेवून गेले असता त्यांनी घरासमोर दुचाकी लावली होती. ती अज्ञात चोरट्याने लंपास केली असून त्या प्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलीसात तक्रार दाखल केली आहे.