Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडकेजकेज शहरासह परिसरातील बारा गावात दुषित पाणी पुरवठा

केज शहरासह परिसरातील बारा गावात दुषित पाणी पुरवठा


नगरपंचायतचे दुर्लक्ष,नागरिकांना विविध आजाराची होवू लागली लागण
केज (रिपोर्टर):- धनेगावच्या धरणावरून केज, धारूरसह बारा गावच्या नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करतांना त्याचे शुद्धीकरण केले जात नाही तसेच अशुद्ध पाणी नागरिकांना पाजण्याचे पाप नगर पंचायत करत असून याकडे वरिष्ठाने लक्ष द्यावे व नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा. अशुद्ध पाण्यामुळे विविध आजाराची लागण होत आहे.
नगर पंचायतचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला, नागरिकांच्या समस्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पाण्याच्या ाबतीत नगर पंचायत गांभीर्याने घेत नाही. धनेगावच्या धरणावरून केजसह धारूर व बारा गावच्या नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करतांना त्याचे शुद्धीकरण केले जात नाही. तसेच अशुद्ध पाणी पुरवले जात असल्याने नागरिकांना आजाराची लागण होवू लागली. फिल्टर प्लॅन काही दिवसापासून बंद पडलेला आहे. तो दुरूस्त न केल्याने अशुद्ध पाणी पुरवले जात आहे. स्व.विमलताई मुंदडा यांच्या कार्यकाळामध्ये नागरी सुविधेकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्या सोडवत नसल्याने लोकप्रतिनिधीच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी अबुताले इनामदार, शेख मजहर, सय्यद दस्तगीर, शेख वसीम, कुरेशी खीजर, समियोद्दीन इनामदार, शेख जावेदसह आदींनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!