Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

१२९ ग्रामपंचायतीसाठी ४२४ मतदान केंद्रावर मतदान होणार
बीड (रिपोर्टर):- दोन दिवसाने बीड जिल्ह्यामध्ये १२९ ग्राम पंचायतसाठी मतदान होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपली पुर्ण तयारी केली असून ४२४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी अडीच हजार कर्मचार्‍यांचा स्टाफ निवडणूक आयोगाने आपल्याकडे घेतला असून या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार १६ ईव्हीएम मशिन तहसील कार्यालयाला उपलब्ध करून दिले आहे.


मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी मतदान होत आहे. यामध्ये नित्रुड, दिंद्रुड सारख्या मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठीही मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्ष या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात याव्या म्हणून प्रयत्न करत आहेत. जिल्हा प्रशासनानेही या मतदान प्रक्रियेसाठी पुर्ण तयारी केली आहे. ४२४ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक विभागाने पोलीस फौजफाट्यासह जवळपास अडीच हजार कर्मचारी आपल्याकडे उपलब्ध करून घेतलेला आहे. बॅलेट पेपर आणि कंट्रोल मशिन याच्यासह १ हजार १६ ईव्हीएम मशिन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या आहेत. संबंधित तहसीलकडून उद्या या ईव्हीएम मशिनसह कर्मचारी निवडणूक होत असलेल्या गावी रवाना होतील.


२५ जानेवारीला
सरपंच पदाची सोडत

राज्याच्या ग्रामविकास विभागाने निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती आणि भविष्यात दोन वर्षानंतर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहेत. अशा सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढले होते. मात्र अचानक ते रद्द केले. मात्र नुकताच राज्याच्या ग्रामविकास विभागाने एक निर्ण घेवून येत्या २५ जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचे घोषित केले आहे. या आदेशात निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासोबत ज्यांची मुदत २ वर्षे राहिलेल्याही ग्रामपंचायतीची सरपंच पदाचे आरक्षण काढायचे का कसे हे मात्र स्पष्ट झालेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!